💥बालविवाह प्रतिबंध चळवळ लोक चळवळ बनावी - कैलास तिडके


💥राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनींनी सुजाण व समृद्ध समाज निर्माण करण्याकामी योगदान द्यावे💥

      समाज जीवनातील अनिष्ट प्रथा परंपरा नष्ट करण्यासाठी जनजागृतीची गरज असून आजच्या युवकांनी बालविवाह सारख्या अनिष्ट प्रथांना मोडीत काढण्यासाठी लोकमनाचे प्रबोधन करावे .त्यातूनच लेकीच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून द्यावे. ग्रामीण आणि अशिक्षितांमध्ये बालविवाहाचे प्रमाण वाढत आहे. बालविवाह करणारा पैकी परभणी जिल्हा राज्यात अग्रेसर असून मा.जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बालविवाह प्रतिबंध  चळवळ सुरू केली आहे.ती यशस्वी करण्यासाठी युवाशक्ती ने संघटीत होत बालविवाह सारख्या घातक प्रथा बंद करुन शहर, गावोगावी,मागासवस्ती सह गरजेच्या ठिकाणी बालविवाहाचे वाईट परिणाम पटवून देत. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थीनींनी सुजाण व समृद्ध समाज निर्माण करण्याकामी योगदान द्यावे.असे आवाहन महिला व बालकल्याण विभाग,जि.प.परभणीचे अधिकारी डॉ.कैलास तिडके यांनी केले.

            कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालय ,परभणी .राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने मौजे हसनापूर येथे आयोजित युवती विशेष शिबीरात डॉ.कैलास तिडके बोलत होते.व्यासपिठावर विशाल जाधव उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग परभणी.प्रकाशराव खरडे,सौ.शिवनंदाताई खरडे,सौ.सरस्वतीताई खरडे,सौ.वेणूताई खरडे,सौ.गौकर्णाताई खरडे,सदाशीव आप्पा खरडे,मारोतराव भरकड,दिगंबर कदम, खताळ,प्रा.डॉ.नसिम बेगम,प्रा.डॉ.दिनेश धनेश्वर,प्रा.अर्जून सुरवसे आदी उपस्थित होते.

            शिक्षणाच्या अभावामुळेच बालविवाहा सारख्या समस्या निर्माण झाल्या आहेत.मुलगी एक बोज समजून कुटुंबात दुय्यम स्थान दिले गेले.मुलाचे अपराध क्षमापित करताना लेकीच्या जातीनं असच वागायचं ही रुढी विघातक असून मुली व महिलांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे.सुजाण व शिक्षित लोकांनी या वाईट रिवाजा विरुद्ध एकसंघपणे लढलं पाहिजे असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग जि.प.परभणीचे विशाल जाधव यांनी केले. 

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.आरती बोधले हिने केले तर आभार कु.अलविरा खान हिने व्यक्त केले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या