💥सत्य जरी गोड,बोलणे कठीण,सैल होई वीण,नात्यातली💥
शब्दांचेच तीळ,
शब्दांचाच गूळ,
स्नेहाचे हे मूळ,
शब्दातीत!
सत्य जरी गोड,
बोलणे कठीण,
सैल होई वीण,
नात्यातली!
संक्रांत निमित्त,
स्नेह हाच हेतू,
उभारावे सेतू,
मनोमनी!
कोरडा न व्हावा,
प्रेमाचा ओलावा,
अभंग रहावा,
भाव बंध!
तिळातला स्नेह,
गुळातली गोडी,
सुटतात कोडी,
अबोलाची!
मकर संक्रांतीच्या शुभेच्छा
शुभेच्छुक
पत्रकार मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद
बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख !!
0 टिप्पण्या