💥परभणी येथे आरोग्य कर्मचार्‍यांनी केली आरोग्य प्रशासनाच्या विरोधात जोरदार निदर्शने....!


💥वैद्यकीय अधिकारी/कर्मचार्‍यांनी 2 महिन्याचे वेतन थकविल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करीत केली निदर्शने💥  

परभणी (दि.05 जानेवारी) : येथील अस्थिव्यंग रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांनी दोन महिन्याचे वेतन थकविल्याच्या निषेधार्थ कामबंद आंदोलन करीत आज गुरुवार दि.05 जानेवारी 2023 रोजी जोरदार निदर्शने केली.

              येथील अस्थिव्यंग रुग्णालय व 50 खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय असून हे रुग्णालय जिल्ह्यातील एकमेव अस्थिव्यंग रुग्णालय आहे. त्या ठिकाणी उपचाराकरीता रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच या रुग्णालयात 30 अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु, नोव्हेंबर 2022 व डिसेंबर 2022 चे वेतन अनुदान नसल्यामुळे प्रलंबित राहीले आहे. या संदर्भात सर्व अधिकारी-कर्मचार्‍यांनी वैद्यकीय अधिक्षकांना याबाबी निदर्शनास आणून दिल्या. वेतन अनुदान नसल्यामुळे वेतन थकल्याची बाब स्पष्ट केली. यामुळे बँकांचे हफ्ते किंवा अन्य रकमा थकल्या आहेत. मुलांच्या शाळा, महाविद्यालय व शिकवणीचे शुल्कसुध्दा देता येईनासे झाले आहे. या प्रकाराने आपण सर्व कर्मचारी मानसिकदृष्ट्या हैराण झालो असून प्रशासनाने वेळेवर वेतन द्यावे, अशी अपेक्षा या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. व रुग्णालयासमोर जोरदार निदर्शने केली.

यावेळी श्रीमती मीना देशमुख, ए.जी. सोनकांबळे, एस.बी. कुलकर्णी, एस.ई. लोखंडे, ई.डी. जोंधळे, शिराज शेख, राजेंद्र शिंदे, एन.आर. शिंगाटे, सोमनाथराव पिंपरे, रामा चांदणे आदींच्या या निवेदनावर स्वाक्षर्‍या आहेत दरम्यान, राज्य सरकारी मध्यवर्ती महासंघाचे वर्ग-3 चे जिल्हाध्यक्ष मंगेश जोशी, वर्ग-4 चे जिल्हाध्यक्ष शिराज शेख, अमोल सोनकांबळे, मीनाताई देशमुख, सुजाता कांबळे व अस्थिव्यंग रुग्णालयातील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या