💥‘बालविवाह मुक्त परभणी’ उपक्रमातील बोधचिन्ह व घोषवाक्याचे विमोचन....!


💥उपक्रमातील बोधचिन्ह व ‘सर्वांनी आता ठरवूया, बालविवाहाला हरवूया’ या घोषवाक्याचे विमोचन करण्यात येणार आहे💥

परभणी (दि.03 जानेवारी) : जिल्ह्यात होणारे बालविवाह थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या संकल्पनेतून ‘बालविवाहमुक्त परभणी’ ही चळवळ राबविण्यात येणार आहे. या सामाजिक उपक्रमात लोकसहभाग वाढावा, यासाठी बुधवारी (दि. 04) रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ‘बालविवाह मुक्त परभणी’ उपक्रमातील बोधचिन्ह व ‘सर्वांनी आता ठरवूया, बालविवाहाला हरवूया’ या घोषवाक्याचे विमोचन करण्यात येणार आहे.

 या कार्यक्रमाला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती यु. एम. नंदेश्वर या प्रमुख अतिथी तर जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार आहे. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रागसुधा आर., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, मनपा आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, महिला व बालविकास विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती हर्षा देशमुख, महिला व बालविकास विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव आदी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करतील.

कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते कृती आराखड्याचे अनावरण करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह 26 सदस्यांचा समावेश असलेल्या या चळवळीत नागरिकांचा सहभाग वाढवून सामाजिक चळवळीचे स्वरूप द्यायचे आहे. त्यामुळे बालविवाहमुक्त परभणी ही सामाजिक चळवळ व्हावी, आणि परभणी जिल्हा बालविवाहमुक्त व्हावा, यासाठी सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी केले आहे. तसेच या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या