💥पुर्णा तालुक्यातील महसुल प्रशासनाच्या खडीक्रशर दगडखानपट्टा कारवाई नाट्याचे पित्तळ अखेर पडले उघडे....!


💥खडीक्रशर सिल करण्याचे रंगवले नाट्य : रात्रीच्या वेळेला स्फोटकाद्वारे उत्खननासह खडीक्रशरही चालताय बेकायदेशीर💥


 
परभणी/पुर्णा (दि.३० जानेवारी) - पुर्णा तालुक्यात मागील अनेक वर्षापासून जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी कायम बंदसह परवान नुतनीकरणाची केवळ नोंद ठेवून प्रत्यक्षात मात्र नियमितपणे प्रचंड प्रमाणात बेकायदेशीर स्फोटकांद्वारे उत्खनन व खडी निर्मितीचा कारोभार महसुल प्रशासन व तहसिलदार यांच्या संगणमतातून शासनाला रॉयल्टीच्या स्वरुपात प्राप्त होणारा लाखों रुपयांचा महसुल बुडवून चालत असल्याचा गंभीर प्रकार प्रसार माध्यमांनी उघडकीस आणल्यानंतर स्थानिक तहसिलदार टेमकर व महसुल प्रशासनातील गौण खनिज माफीयांची आर्थिक हितसंबंध जोपासत पाठराखण करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांनी मागील वर्षी १६ डिसेंबर २०२२ रोजी पुर्णा तालुक्यातील तब्बल १४ खडीक्रशर व दगडखानपट्टे सिल करण्याचे नाट्य रंगवून दि.१९ डिसेंबर २०२२ जिल्हा खनिकर्म अधिकारी परभणी यांना गौण खनिजाच्या अनाधिकृत उत्खननासह दगडखानपट्टे/दगडगिट्टी मोजनी करीता ड्रोन उपलब्ध करुन देण्याची लेखी पत्र क्र.जा.क्र.२२२/गौण खनिज/कावी या पत्राद्वारे मागणी केली परंतु प्रत्यक्षात मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई न करता संबंधित खडीक्रशर व दगडखानपट्टे धारकांना पाठीशी घालण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने महसुल प्रशासनाचा सावळा गोंधळ शुक्रवार दि.२७ जानेवारी २०२३ रोजी तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्या दालनात दाद मागण्यासाठी प्रत्यक्ष पुराव्यासह हजर झालेला तालुक्यातील खडाळा येथील शेतकरी दामोदर सुदामराव हिंगे शेत सर्वे क्रमांक २४ हा महसुल प्रशासनातील भ्रष्ट कारभाराची अक्षरशः चिरफाड करून गेला.


पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर व महसुल प्रशासनाने सिल केलेल्या तालुक्यातील बेकायदेशीर चालणाऱ्या १४ खडीक्रेशर/दगडखानपट्ट्यातील खडाळा येथील व्यंकटेश नंदकुमार वडगावकर हा खडीक्रशर दगडखानपट्टा धारक आपले सर्वे क्र.२४ मधील संबंधित खडीक्रशर/दगडखानपट्टा महसुल प्रशासनाने सिलनाट्य रंगवल्यानंतर देखील रात्रीच्या अंधारात स्फोटकांचा वापर करीत प्रचंड प्रमाणात उत्खननासह बेकायदेशीररित्या खडीक्रेशर चालवून खडीनिर्मितीचा उद्योग सुरळीतपणे चालवत असल्याचे व त्यामुळे आपल्या शेतातील पिकांचे प्रचंड नुकसान होत असल्याचा प्रत्यक्ष पुरावा अर्थात नोटकेम मधील फोटो व विडीओ तहसिलदार टेमकर व महसुल प्रशासनाचे नायब तहसिलदार नितेशकुमार बोलुलो यांच्या समोर पत्रकारांसमोर सादर केल्याने तहसिलदार टेमकर यांनी संबंधित खडीक्रशर चालक व्यंकटेश नंदकुमार वडगावकर व संबंधित क्षेत्राचे तलाठी यांना आज सोमवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी तहसिल कार्यालयात हजर होण्याचे आदेश जरी दिले असले तरी प्रत्यक्षात मात्र कारवाई होईल की पुन्हा एकदा कारवाईनाट्य रंगवले जाईल ? या प्रश्नाचे उत्तर तर तहसिलदार टेमकर यांना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनीच विचारावे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या