💥पुर्णा तालुक्यातील महातपुरी शिवारात रानडुक्करांचा धुमाखुळ ज्वारी पिकांची नासाडी....!


💥रानडुक्करांचा बंदोबस्त करून ज्वारी पिकांची पहाणी करून नुकसान भरपाई द्यावी - मल्हारी सोनकांबळे

पूर्णा तालुक्यातील महातपुरी शिवारात शेतात रानडुकरांनी धुडगूस घालून ज्वारी पिकाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करून नुकसान केले. यामुळे शेतकरी वर्ग हतबल झालेला दिसत आहे नुकसान झालेल्या पिकांची तहसिलदार,तलाठी यांनी पहाणी करून भरपाई द्यावी अशी मागणी मल्हारी सोनकांबळे व अनेक शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

रानडुक्कर उच्छादामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होते. रानडुक्कर शेतातील ज्वारी यासारखी पिकं नष्ट करतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. कसेबसे कर्ज काढून पिकवलेली पिकं जमीनदोस्त होत असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत. कितीही रंगीत साड्या पिकांभोवती बांधणे व बुजगावणे लावा, तरी उच्छाद काही कमी होत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या