💥यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल व प्रतिभा प्राथमिक मराठी व इंग्रजी शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन....!


💥कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती💥 


 
(फुलचंद भगत)

मंगरूळपीर :- येथील यशवंतराव चव्हाण इंग्लिश स्कूल व प्रतिभा  प्राथमिक मराठी व इंग्रजी शाळा  यांच्या संयुक्त विद्यमाने  वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास 28 जानेवारी रोजी  सुरवात झाली. या उदघाटन  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे तर उद्घाटक  म्हणून प्रियाताई ठाकरे जनाबाई ठाकरे शिक्षण प्रसारक मंडळ  संचालिका तर प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती सविता अतकरे ऊपशिक्षणाधिकारी प्राथ. वाशीम , श्री. शिंदे,ए .डी.आय पं. समिती मंगरूळपीर, श्री. गायकवाड ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एज्युकेशन ऑफिसर न. प. मंगरूळपीर, श्री. ओमप्रकाश झिमटे  प्राचार्य वाय .सी .बी .एड. कॉलेज , श्रीमती सारा प्राचार्य वाय. सी .इंग्लिश, श्री. चव्हान प्राचार्य वाय .सी. बी.पी.एड. कॉलेज  मंगरूळपिर हे होते. यावेळी  मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन करून व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली.  


यावेळी अध्यक्षीय भाषणात चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले की, या वार्षिक स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो  त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले  पाहिजे असे सांगितले.यावेळी मंचावर मुख्याध्यापक सदानंद इंगोले , व्यास,नीलटकर,प्राचार्या पुरोहित उपस्थित होत्या. पहिल्या दिवसापासून सुरू असलेल्या या स्नेहसंमेलनाला पालक वर्गाणी मोठी गर्दी केली  विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नुत्य , आदिवासी न्रुत्य याचे सुंदर सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिभा प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक सदानंद इंगोले यांनी केले तर सूत्रसंचालन  दिपाली अग्रवाल मॅडम , शितल मॅडम , प्रज्ञा खाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन रोशन भोयर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ओम चौधरी ,निलेश पाटील सर, अनेकर तसेच सर्व शाळेचे  मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले....

प्रतिनीधी :- फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या