💥ऑटोचालकाची मुलगी चमकली रुपेरी पडद्यावर.....!


💥हिंगोलीतील रश्मी रायबोलेचे होतेय सर्वत्र कौतुक,कष्टातून मिळविले यश💥


शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

सध्या राज्यभर गाजत असलेल्या 'गैरी' चित्रपटातून शहरातील गंगानगर येथील रश्मी रायबोले हिने ओळख निर्माण केली आहे. यामुळे रश्मीचे सर्वत्र कौतुक होत आहे. गंगानगरात राहणाऱ्या एका सर्व सामान्य कुटुंबातून जन्माला आलेल्या रश्मीला सुरवातीपासूनच नृत्याची आवड होती. शाळा व महाविद्यालय स्तरावर विविध स्पर्धेत तिने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. तसेच आई-वडील यांनाही रंगभूमीची आवड होती. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत रश्मी सुद्धा नृत्य, अभिनयाचे घडे गिरवू लागली. रुपेरी पडद्यावर झळकायचे, अशी जिद्द मनात ती बाळगत होती. परंतु, परिस्थिती बेताची असल्याने रश्मीचे वडील मदन रायबोले यांनी ऑटो चालवून मुलीला शिक्षणाचे धडे दिले. 


रश्मीनेही वडिलांच्या कष्टाचे जीच म्हणून नृत्य व नाटकात पुरस्कार मिळविले. यातून तिला स्पेरी पडद्याची ओढ जाणवू लागली. एकदा तरी चित्रपटात काम करायचे, असा चंग तिने बांधला. तिची हौस बघून कवी शिवाजी कन्हाळे यांनी गैरी चित्रपटाचे निर्मात प्रवीण बियाणी, दत्तात्रय जाधव व दिग्दर्शक पांडुरंग जाधव यांची भेट घेऊन रश्मीला गैरी चित्रपटामध्ये भूमिका देण्याची विनंती केली. रश्मी रायबोलेया मुलीमध्ये असलेल्या गुणांची पारख करून दिग्दर्शक व निर्मात्यांनी 'गैरी' या चित्रपटात रश्मीला प्राध्यापिकेची भूमिका दिली. 'गैरी' हा चित्रपट आदिवासी जीवनावर प्रकाश टाकणारा आहे. या चित्रपटातून शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे. चित्रपट चांगल्या प्रकारे चालत असून, या मधील रश्मी रायबोलेची भूमिका प्रेक्षकांना भावली आहे. रश्मीचे वडील मदन रायबोलेयांनी ऑटोरिक्षा चालवून मुलींना शिकविले. आई चंद्रज्योती ही आरोग्य सेविका होत्या. दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. वडील मदन रायबोले हे अर्धागवायूच्या आजाराने आता बेडवर आहेत. पती अमित मोरे (रा. खंडवा, मध्यप्रदेश) यांनी रश्मीला चित्रपटात काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. एका साधारण कुटुंबातील मुलीने मिळविलेले यश अनेकांना या क्षेत्रात प्रोत्साहित करणारे आहे.

प्रत्येकाच्या जीवनात संकटे असतात, ती पेलण्याची तयारी स्वीकारली तर यश हमखास मिळते. यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे. जिद्द व कठोर मेहनत केल्यास यश निश्चितच मिळते.

*•रश्मी रायबोले*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या