💥पुर्णेतील कोट्ट्यावधी रुपयांच्या शासकीय गायरान भुखंडाचा घोळ संपता संपेना....!


💥उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पोलिस स्थानकाच्या इमारतीसाठी जागेची शोध मोहीम थांबणार केव्हा ?💥


परभणी/पुर्णा (दि.३० जानेवारी) - पुर्णा शहरातील महत्वाच्या मध्यभागात उच्चभ्रू वसाहतींच्या आसपास तब्बल १९ हेक्टर १४ आस शासकीय गायरान जमिनीची उपलब्ध असतांना देखील सर्वे नं.१४ या कोट्ट्यावधी रुपयांच्या शासकीय गायरान जमीनीचा घोळ संपता संपत नसून जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांनी दि.१६ डिसेंबर २०२२ रोजी पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर यांच्यासह उपअधिक्षक भुमी अभिलेख कार्यालय यांना लेखी स्वरुपात जा.क्र.२०२९/आरबी/डेस्क/एलएनडी-१/कावी-४१२ जिल्हाधिकारी कार्यालय परभणी याद्वारे आदेश जारी करुन या आदेशात या सर्वे नंबर १४ च्या शासकीय गायरान जमीनीवर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पुर्णा पोलिस स्थानकाच्या भव्य इमारतीसाठी जागा उपलब्द करुन देण्याचे निर्देश दिले या आदेशाला तब्बल दिड महिन्याचा कालावधी उलटत असतांना देखील अद्याप पर्यंत उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाला जागा उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न 'जैसे थे'च असल्याचे दिसत असून अजून ही शोध मोहीम संपलेली नाही.

पुर्णा शहरात सर्वे नंबर १४ हा सर्वात मोठा शासकीय भुखंड अर्थात शासकीय गायरान जमीन असून यातील १४/१ ते १४/९ पैकी १४/३ मधील ४० आर (१ एक्कर) शासकीय गोदामासाठी,०५ एक्कर ०२ आर (२ हेक्टर ०२ आर) कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी,१४/४ मधील १ हेक्टर २५ आर (३ एक्कर ०५ आर) राज्य परिवहन महामंडळासाठी,२ हेक्टर १० आर (०५ एक्कर १० आर) लासिना पाटबंधारे विभागासाठी,१४/५ मधील २० आर (अर्धा एक्कर) बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर स्मारक बुध्द विहारासाठी,१४/६ मधील ०.११ आर बौध्द विद्यार्थी वस्ती गृहासाठी,१४/७ मधील ०.१४ आर शेड्यूल्ड काष्ट हॉस्टेलसाठी,१४/८ मधील ०२ हेक्टर ०२ आर (५ एक्कर २ आर) शासकीय विश्रामगृहासाठी तर १४/९ मधील ०२ हेक्टर २ आर (०५ एक्कर २ आर) जिल्हा परिषद माध्यमिक शाळेसाठी देण्यात आली असून या सर्वे नंबर १४ मधील १९.१४ आर या शासकीय गायरान जमिनीच्या उर्वरीत भुखंडाची शोध मोहीम अध्यापही थांबली नसल्याचे निदर्शनास येत असून हा कोट्यावधी रुपयांचा गायरान जमिनीच्या भुखंडाची नगर परिषद प्रशासनातील भ्रष्टाचारी अधिकारी/कर्मचाऱ्यांनी भुखंड माफियांशी आर्थिक हितसंबंध जोपासत बोगस कागदपत्रांच्या आधारे विल्हेवाट लावल्यामुळे प्रशासनाला उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व पोलिस स्थानकाच्या इमारत बांधकामासाठी भुखंड शोध मोहिमेला पुर्णविरामच लागत नसल्याचे निदर्शनास येत आहे. 

पुर्णा शहरातील सर्वे क्र.१४ या शासकीय गायरान जमिनीवर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयासह पोलिस स्थानकाच्या इमारतीसाठी जागा उपलब्द करुन देण्याच्या दृष्टीने जागेची पाहणी करण्यासाठी दि.२३ जानेवारी २०२३ रोजी पुर्णा नगर परिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील,आरडीसी श्री.वडदकर,भुमी अभिलेख अधिक्षक श्री.शेख,तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी आडगाव (ला.) रस्त्यावरील कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमेटी) सह परिसरातील अतिक्रमणांसह बेकायदेशीर चालत असलेल्या बांधकामांची व यापुर्वी सर्वे नंबर १४ मधील मोजमाप निशानी केलेल्या जागेंची पाहनी केली या संदर्भात पुढील कारवाई काय झाली किंवा काय होणार ही बाब अद्याप तरी गुलदस्त्यातच आहे......

 

 

  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या