💥भारतीय सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी पूर्व प्रशिक्षणाची संधी....!


💥असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे💥

परभणी (दि.25 जानेवारी) :  महाराष्ट्रातील युवकांचा देशाच्या संरक्षण दलात सहभाग वाढावा, यासाठी राज्य शासनातर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पूर्व तयारी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे मोफत निवासी प्रशिक्षणातून करून घेण्यात येते. या प्रशिक्षणासाठी परभणी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, परभणी येथे शुक्रवारी (दि.27) मुलाखतीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 

संघ लोकसेवा आयोगामार्फत कोणत्याही शाखेच्या पदवीधर उमेदवारास 16 एप्रिल रोजी होणाऱ्या कंम्बाईंड डिफेन्स सर्व्हीसेस या संरक्षण दलातील अधिकारी पदासाठीच्या परीक्षेची पूर्व तयारी नाशिक येथे करून घेण्यात येणार आहे. नवयुवक –युवतींसाठी 1 फेब्रुवारी ते 9 एप्रिल 2023 या कालावधीत सीडीएस कोर्स क्रमांक 60 यासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. 

मुलाखतीस येतेवेळी फेसबुक वेबपेज वर डिपार्टमेंट ऑफ सैनिक वेल्फेअर, पुणे वर सर्च करून त्यामधील सीडीएस 60 कोर्ससाठी प्रवेशपत्र व सोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ती पूर्ण भरून सोबत आणावी. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक यांच्या 0253-245032 वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या