💥पुर्णेतील सर्वे नंबर १४ या शासकीय गायरान जमिनीवरील भुंखंड बोगस कागदपत्रांच्या आधारे हडप करणाऱ्यांवर कारवाई करा...!


💥तक्रारदार चंद्रमुनी लोखंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली आमरण उपोषणाला सुरुवात💥 

पूर्णा (दि.२५ जानेवारी) - पुर्णा शहरातील उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैभव जिनिंग,आडगाव (ला.) रोड,अभिनव शाळा,बसस्थानक लगतच्या आसपासचा परिसर,लोखडे कॉम्पेक्स,बोर्डीकर प्लॉटींगच्या जवळील काही भाग असलेला सर्वे क्रमांक १४ ही जमीन मुळात गायरान असुन या गायरान जमिनीवरील भुखंड भुखंड माफियांनी सर्वे नंबर १२/१७/१८ इत्यादी सर्वे क्रमांकावरील रजिष्ट्र्या बोगस कागदपत्रांच्या आधारे करीत नगर परिषदेतील भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन त्या आधारे सर्वे क्रमांक १४ या शासकीय गायरान जमिनींवरील १४/१ ते १४/९ या भुखंडावर आपल्या अलिशान बिल्डिंगी उभारल्याचे निदर्शनास येत असुन अश्याच प्रकारे सर्वे क्रमांक १४/२ हा भुखंड शासनाच्या सरकारी गोदामाचा असुन त्याचे क्षेत्रफळ ०.४० आर (१ एक्कर) आहे त्या भुखंडामध्ये नगर परिषद पूर्णा कार्यालयातील नामांतर विभागाचे कर्मचारी,कर विभाग प्रमुख,कार्यालयीन अधिक्षक यानी हाथ मिळवुन भ्रष्टाचार करुन सरकारी गोदामच्या भुखंडा मध्ये एक प्लॉट भुखंड माफियांचे नावाने रिव्हिजनला बेकायदेशीरित्या नोदं करुन तो शासकीय भुखंड हाडप करुन त्याला घर नं.४-९-५९३ असा दिला आहे.

सदरील भुखंड हाडप करणाऱ्यासह नगर परिषद रिव्हिजन रजिष्टरला बेकायदेशीर नोंद करून देणारे अधिकारी,कर्मचारी यांचेवर फौजदारी गुन्हा दाखल करुन योग्य कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी चंद्रमुनी लोखंडे यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे केली असून संबंधितांवर कारवाई व्हावी याकरिता त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणाला देखील सुरुवात केली अलस्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल या प्रकरणी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.....  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या