💥जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया तर्फे दर्पण दिन साजरा.....!


💥यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.सुनील बुधवंत यांची उपस्थिती💥 

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया तर्फे आज दर्पण दिन तसेच पत्रकार दिनाचे औचित्य साधून शासकीय विश्रामगृह जिंतूर येथे सकाळी दहा वाजता बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार गुलाल लावून दर्पण दिन तथा पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

 यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ॲड.सुनील बुधवंत तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार हे होते. यावेळी अँड. सुनील बुधवंत यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर व  जन्मदिन नसताना दर्पण दिन आहे असे सांगून त्यांच्या जीवनावर  मार्गदर्शन केले व तसेच महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कोकडवार यांनीही आपले विचार व्यक्त केले याप्रसंगी महाराष्ट्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप बोकडवार अँड. सुनील बुधवंत, विशाल घुगे, आडे, जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडियाचे तालुकाध्यक्ष अजमतखान पठाण,  रहीम भाई सचिव, फिरोज भाई संघटक, उर्फ बाबा भाई, कार्याध्यक्ष बि.डी. रामपूरकर, उपाध्यक्ष बळीराज भराडे, शेख हानीफ बोरी आदी  इलेक्ट्रिक मीडिया चे पत्रकार उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या