💥मकर संक्रांति निमित्त देवूळगाव दुधाटे येथील जिल्हा परीषद शाळेत आयोजित हळदी कुंकवाच्या कार्यक्रमा प्रसंगी त्या म्हणाल्या💥
पूर्णा (दि.३० जानेवारी) - कायदा श्रेष्ठ मानुन बालविवाह होणार नाही ही जानीव जागृती ग्रामीण भागात करणे गरजेचे आहे कारण मुलीचे भविष्य उज्वल करण्यासाठी कायद्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहीजे असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेड जिल्हा संघटक सौ.राधाताइ दुधाटे यांनी केले.
मकर संक्रांति निमित्त देवूळगाव दुधाटे येथील जिल्हा परीषद शाळेत शनिवार दि.३० जानेवारी २०२३ रोजी घेतलेल्या कार्यक्रमात हळदी कुंकवाचा निमित्ताने माता पालक संघ मेळावा. व बालविवाह जानीव जागृती या दुहेरी कार्यक्रमात राधा दुधाटे बोलत होत्या कार्यक्रमासाठी उपस्थित सरपंच सौ.ललिताबाई कांबळे,सौ.इंदुबाई दुधाटे,भागीरथीबाई दुधाटे,गयाबाई दुधाटे,गिता दुधाटे,संध्या मुरंकुदे-सेंद्रिय शेतीचा वापर,कविता मुरकुंदे -शेती वर जोडधंदा व्यवसाय,सिंधू लोमटे -किशोरवयीन मुलींना ,सोनाली भालेराव:-, स्वच्छता.उत्कर्षा बोडगमवार - आहार.राधा दुधाटे-वृक्ष लागवड स्मशानभूमी बालविवाह या बाबत मार्गदर्शन केले
कार्यक्रमासाठी गावातील माता पालक जास्त संख्येने उपस्थित होते . विविध विषयात मार्गदर्शन करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. सिमा पौळ यांनी केले सूत्रसंचालन सौ. शिवकन्या देवडे यांनी केले .आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजक शिवमती राधाताई दुधाटे जिल्हा संघटक जिजाऊ ब्रिगेड परभणी यांनी केले .
0 टिप्पण्या