💥जिंतूरचे मा.आमदार विजय भांबळे यांनी अपघातात जखमीस स्वतः उचलून ॲम्बुलन्स मध्ये ठेवून दवाखान्यात पाठवले....!


💥अपघातग्रस्त रामराव अंबादास आंधळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले होते💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रामपूरकर

जिंतूर येथील माजी आमदार विजयराव भांबळे हे जिंतूरून सेलू कडे जात असताना अचानक जिंतूर पासून पाच किलोमीटर अंतरावर अकोली गावाजवळ पुलावर मोठी गर्दी दिसल्याने त्यांनी तात्काळ आपली  गाडी थांबून झालेल्या अपघाताबाबत चौकशी करत राष्ट्रवादी च्या अंबुलन्स बोलून स्वतः अपघात ग्रस्त व्यक्तीला उचलून ॲम्बुलन्स मध्ये ठेवले. अपघातग्रस्त रामराव अंबादास आंधळे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याचे दिसले व डोक्यातून रक्तस्त्राव सुरू झाला होता. 

      जास्त वेळ न घालवता माजी आमदार विजय भांबळे यांनी तातडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुग्णवाहिकेला बोलवून रुग्णाला स्वतः रुग्णवाहिकेत बसवले आणि पुढील वैद्यकीय उपचारासाठी जिंतूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तसेच अपघाताची सूचना शल्यचिकित्सक डॅा. चांडगे यांना दिली आणि आवश्यक ते उपचार करावी, कुठलीही कमतरता पडू नये यासंबंधी सूचना दिल्या.

अपघातग्रस्त जिंतूर तालुक्यातील आसोला येथील  असून यांच्या कुटुंबियांना सुद्धा संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तसेच काळजी करू नये असे सांगत धीर दिला.  डॉक्टरांशी बोलणे करून त्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना जालना येथे रवाना केले आहे. याबाबत बातमी लिहीपर्यंत पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही नोंद झाली नव्हती....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या