💥निरोगी राहण्यासाठी वनौषधींचा वापर करा - प्रा संजय दळवी


💥पूर्णेतील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे आयोजित"युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास ते म्हणाले💥

पुर्णा (दि.१४ जानेवारी) "आपण उठसुठ छोट्या छोट्या गोष्टींसाठी डॉक्टर कडे जावून गोळ्या औषधे खात राहतो. पण त्याचे खूप अनिष्ट परिणाम आपल्या शरीरावर होत असतात. हे टाळणे शक्य आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या पूर्वजांनी वापरले तसे वनौषधी वापराव्या लागतील" असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ संजय दळवी यांनी केले. पूर्णा येथील श्री गुरु बुद्धिस्वामी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे "युवकांचा ध्यास ग्राम-शहर विकास"  या विशेष शिबिर मौजे भाटेगाव येथे सुरू आहे. सदरील सात दिवशीय विशेष शिबिरात आज तिसऱ्या दिवशी झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा डॉ संजय दळवी उपस्थित होते. स्वछतादूत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रा संजय दळवी यांनी आपल्या आसपास उपलब्ध असणाऱ्या विविध वनौषधींची माहिती व त्यांचा वापर कसा करायचा याची सविस्तर माहिती उपस्थितांना करून दिली. 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सायन्स कॉलेज नांदेड मधील प्राध्यापक डॉ उल्हास पत्की यांनी विद्यार्थ्यांना संगणक क्षेत्रातील करिअर च्या संधी यावर व्यापक मार्गदर्शन केले उपसरपंच श्री रामराव कऱ्हाळे, डॉ शिवसांब कापसे,डॉ जितेंद्र पुल्ले, डॉ पल्लवी चव्हाण, डॉ शेषेराव शेटे, डॉ बाळासाहेब मुसळे, डॉ संतोष चांडोळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व आणि चारित्र्य विकास करण्यासाठी या सात दिवशीय शिबिरात उपस्थित राहून ग्रामीण भागातील संस्कृती जवळून पहावी,  विशेष शिबिरातील विविध उपक्रमात आपला सहभाग घेऊन समाजासाठी आपले काही देण आहे यासाठी सदरील शिबिर घेण्यात येत आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ पुष्पा गंगासागर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सोमनाथ गुंजकर, तर डॉ.अजय कुऱ्हे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.राजू शेख, डॉ. ओंकार चिंचोले, डॉ.विनोद कदम ,श्री बालाजी आसोरे,  कर्मचारी मंचक वळसे, श्री नागोराव सावळे, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या