💥आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची जिंतूरात पत्रकार परिषद....!


💥शैक्षणिक,आरोग्य,सामाजिक,आर्थिक विचार करून सर्वसामान्यांना न्याय देणारी पार्टी म्हणजे आम आदमी पार्टी - हरिभाऊ राठोड

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर येथे पत्रकार परिषद आम आदमी नेते राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांनी जिल्हा युवा अध्यक्ष अँडवोकेट सुनील बुधवंत यांचे शिवाजीनगर निवासी घेण्यात आली.

यामध्ये आपले मत मांडताना माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाली की शैक्षणिक, आरोग्य, सामाजिक व आर्थिक विचार करून सर्वसामान्यांना न्याय देणारी पार्टी म्हणजे आम आदमी पार्टी असल्याचे त्यांनी सांगितले त्याचबरोबर आमची पार्टी नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, तसेच लोकसभा या सर्व निवडणुका लढवणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

पत्रकार परिषदेत शाळा कॉलेज वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा व सवलत देण्याचे काम आम आदमी पार्टी करणार असून आम्ही नागरिकांच्या विश्वासास तडा जाऊ देणार नाही अशीही त्यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेत जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव अँडवोकेट सुरेश चौधरी, जिल्हा युवा अध्यक्ष अँडवोकेट सुनील बुधवंत, ज्येष्ठ सदस्य मंचकराव राव बचाटे, जिंतूर तालुका उपाध्यक्ष सुधीर राठोड, संजय टाकरस, खुशाल घुगे, आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या