💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव जिल्हा परिषद शाळेत थोर महिलांची विद्यार्थांना इंग्रजीत माहिती....!


💥माँ साहेब जिजाऊ व माता सावित्री फुले जयंती निमित्त आबनराव पारवे गुरुजी यांचा कौतुकास्पद उपक्रम💥


पुर्णा (दि.14 जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेती, फुकटगाव आदर्श सहशिक्षक आबनराव पारवे गुरुजी यांनी सावित्री ते जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जादा तासिका घेऊन दिनांक-03 जानेवारी 2023 ते दिनांक-12 जानेवारी 2023 पर्यंत थोर महिलांची इंग्रजीत माहिती दिली.त्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राणी लक्ष्मीबाई,ऍनी बेझंट,अहिल्याबाई होळकर,रमाबाई रानडे,सिंधुताई सपकाळ,पंडिता रमाबाई,जिजाऊ माँ साहेब यांच्याविषयी माहिती देण्यात आली.व तसेच इंग्रजीचे बेसिक कॅपिटल व स्मॉल लेटर्स 4 रेघी वहिमध्ये लिहिण्याचा सराव, 1 ते 1000 पर्यंतच्या अंकांच्या स्पेलिंग बनविण्याचे तंत्र,काना मात्रा वेलांटी उकार व क ते ज्ञ पर्यंतच्या अक्षरांचे स्पेलिंग देऊन पूर्ण क का कि की व नावांचे स्पेलिंग बनविण्याचे तंत्र,Simple Present Tense व Present Continuous Tense चे विधानार्थी नकारार्थी व प्रश्नार्थी वाक्य बनविण्याचा सराव घेण्यात आला.या नवोपक्रमात इ. 1 ली ते इ 8 वी चे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभागी होते.विद्यार्थ्यांच्या लेवलनुसार त्यांना अभ्यास देण्यात आला.


शेवटच्या दिवशी म्हणजे 12 जानेवारी रोजी अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या बोलक्या प्रतिक्रियातुन या उपक्रमाची यशस्विता दिसून आली.विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे होत्या.स्पेलिंग बनविणे सहज जमले,दोन्हीं ABCD चार रेघीत लिहणे,थोर महिला समाजसुधारक माहिती इंग्रजीत सहज सांगता येत आहे,1 ते 1000 पर्यंत अंकांच्या स्पेलिंग सहज बनविता येत आहेत,Tense चे वाक्य सहज बनविता येत आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या