💥जिंतूर येथे 'प्रवासी दिन' व वर्धापण दिन उत्साहात साजरा.....!


💥प्रवासी महासंघ प्रवाशांच्या अडीअडचणीसाठी खंबीरपणे उभा राहील : जयश्रीताई देशपांडे

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर : महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या वर्धापन दिना व रथसप्तमी निमित्ताने जिंतूर बस स्थानकात परभणी जिल्हा प्रदेश प्रवासी महासंघ च्या जिल्हा महिला सदश्या व जिंतूर तालुका प्रवासी संघटनेच्या त्याचबरोबर तालुका ग्राहक पंचायतच्या संयुक्त विद्यमानाने प्रवासी दिन आज दि. २८ जानेवारी, शनिवार रोजी दुपारी १ : ०० वाजता साजरा करण्यात आला.


         दरम्यान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूर आगार प्रमुख व्ही.आर चिभडे,  प्रमुख पाहुणे म्हणून प्रवासी संघाच्या महिला सदस्या सौ.जयश्रीताई देशपांडे, कक्ष प्रमुख बी.पी चिभडे, देवेंद्र अण्णा भुरे, ग्राहक पंचायत तालुकाध्क्ष गुलाबराव शिंदे यांची उपस्थिती होती. तसेच जिंतूर प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन रायपत्रीवार, सचिव अँड. पंकज तिवारी,  कार्यध्यक्ष बालासाहेब रामपूरकर, सहसंघटक संदिप माहुरकर , कोषाध्यक्ष भागवत चव्हाण, संघटक किशोर पारडे, सदस्य अर्जुन पालवे,  अमर्जित राठोड, सौ शैला कुलथे यांच्यासह प्रवाशी उपस्थित होते. यावेळी जिंतूर एसटी बस स्थानक चे चालक यांनी मागील पंचवीस वर्षापासून सेवा बजावली आणि आपल्या सेवेला कुठेच कालबोट लागला नाही अशां चालकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये पी.एम भांबळे, बी. डब्ल्यू गायकवाड, शेख अकबर, डी.टी सांगळे, यु.जी शेंगुकर, पी व्ही घुगे, आर.पी कुटे यांच्यासह स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. याचवेळी ज्येष्ठ  प्रवाशांचाही सत्कार करून फळ वाटप करण्यात आले. प्रवासी संघटनेच्या महिला सदस्या सौ जयाताई देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना प्रवाशांनी आपल्या घराप्रमाणेच बस स्थानकातही स्वच्छता बाळगावी कारण की आपण स्वच्छता बाळगली तर बस स्थानक स्वच्छ राहील आणि प्रवाशांसाठी नेहमीच संघटना प्रवाशांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे आपल्या मनोगत यातून व्यक्त केले. सुत्रसंचलन व आभार बाळासाहेब रामपूरकर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या