💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते ध्वजारोहण समारंभ संपन्न....!💥तर अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ💥

परभणी (दि.26 जानेवारी) : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण समारंभ पार पडला. अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपविभागी़य अधिकारी दत्तू शेवाळे, उपजिल्हाधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड, डॉ. सुशांत शिंदे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती मंजुषा मुथा, तहसीलदार गणेश चव्हाण, श्रीमती छाया पवार यांच्यासह नायब तहसीलदार, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

💥अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ💥


भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांच्या हस्ते प्रशासकीय इमारत येथे ध्वजारोहण समारंभ पार पडला.  यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख वसंत निकम, जिल्हा उपाधीक्षक दत्तू सोनवणे यांच्यासह प्रमुख अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते......


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या