💥आ.लखन मलीक यांच्या प्रयत्नाने वाशिम मंगरुळपीर मतदार संघातील विकास कामासाठी १० कोटी रुपयाचा निधी मंजुर...!


💥शासन निर्णय निर्गमित : वैशिष्यपुर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधीचे वितरण💥

फुलचंद भगत

वाशिम - वाशिम आणि मंगरुळपीर शहरातील विविध प्रलंबित रस्त्याच्या सिमेंटीकरण कामासाठी मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार लखन मलीक यांचे प्रयत्न व पाठपुराव्यामुळे नगर परिषदांना वैशिष्टपुर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेअंतर्गत वाशिम नगर परिषदेसाठी ७.५० कोटी व मंगरुळपीर नगर परिषदेसाठी २.५० कोटी असा एकूण १० कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. नगर विकास विभागााने २९ डिसेंबर रोजी निर्गमित केलेल्या एका शासन निर्णयाव्दारे हा निधी वाशिम व मंगरुळपीर नगर परिषदांना वितरीत करण्यात आला आहे.

  या निधीअंतर्गत निधीअभावी प्रलंबित असलेल्या वाशिम शहरातील प्रमुख रस्त्यांसह प्रभागातील अंतर्गत रस्त्याचे सिमेंटीकरण, पेव्हर ब्लॉक, सुरक्षा भिंत बांधकाम, कंपाऊंड वॉल, बेंचेस आदी एकूण १४ कामे या ७.५ कोटी वैशिष्टयुपुर्ण योजनेतील निधीतून करण्यात येणार आहेत. तसेच मंगरुळपीर शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांचे सिमेटींकरण, लादीकरण, कंपाउंड वॉल अशी एकूण ९ कामे  शासनाच्या वैशिष्टयुपुर्ण योजनेतील २.५ कोटी रुपयाच्या निधीतून करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही वर्षापासून नविनीकरणाच्या प्रतिक्षेत असलेल्या वाशिम व मंगरुळपीर मधील या खराब रस्त्यामुळे वाहतुक प्रभावित झाली असून नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत होता. मात्र वाशिम व मंगरुळपीर विधानसभा मतदार संघातील या रस्त्याच्या सिमेंटीकरणासाठी आ. लखन मलीक यांनी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची मागणी केली होती. रस्त्याच्या कामासाठी आ. मलीक यांनी वेळोवेळी केलेले प्रयत्न व यशस्वी पाठपुराव्याला यश आले आहे. या निधीतून रस्त्यांची कामे लवकरात लवकर सुरु करुन वाहतुकीला दिलासा देण्याची मागणी नागरीकांमधून होत असून यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल आ. लखन मलीक यांचे मतदार संघातील नागरीकांमधून कौतूक होत आहे. सध्या निवडणूक आचारसंहिता असून आचारसंहिता संपल्यावर लवकरच आ. लखन मलीक यांच्या हस्ते रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती आहे.


प्रतिनीधी : फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या