💥गंगाखेड येथे जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट कार्यक्रम संपन्न....!


💥या कार्यक्रमाची सुरुवात कृषी अधिकारी कार्यालय परभणी येथून करण्यात आली💥

 गंगाखेड (दि.२५ जानेवारी) - कृषी विभाग यांच्याकडून प्रत्येक महिन्यामध्ये जिल्हा मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेट ही विद्यापीठाच्या सहकाऱ्याने आयोजित करण्यात येते. त्यानुसार जानेवारी २०२३ या महिन्याचे मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटीचा कार्यक्रम हा   जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यामध्ये दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाला. 


या कार्यक्रमाची सुरुवात कृषी अधिकारी कार्यालय परभणी येथून करण्यात आली. यावेळी कृषी विभागाचे श्री पी.बी.बनसावडे ता. कृषी अधिकारी गंगाखेड, डॉ.जि. डी.गडदे कृषी विद्या वेता  वनामकृवी परभणी, प्रा.अमित तुपे वनामकृवी परभणी, डॉ. जगताप  एस एन,तंत्र अधिकारी, श्री देशमुख आबासाहेब ता.कृषी अधिकारी पालम, श्री नांदे सर ता. कृषी अधिकारी पाथरी, कु. पौळ एस जी, मंडळ कृषी अधिकारी गंगाखेड, श्री बोबडे आर डी मंडळ कृषी अधिकारी राणीसावरगाव, तसेच कृषी विभागातील श्री बी जी चव्हाण, श्री देशमुख एम एस, श्री टकले आर बी, श्री पाटील शंकर, श्री बेले जी एम, श्री मत लाकुटे व्ही टी , श्री ठाकरे एन एस, श्री सोनटक्के सर हे उपस्थित होते. प्रक्षेत्र भेटी दरम्यान गंगाखेड तालुक्यातील पिंपरी झोला येथील प्रगतशील शेतकरी श्री लक्ष्मण मुरकुटे, यांच्या शेतावरती पेरू कागदी लिंबू, चिकू फळबागाची पाहणी करण्यात आली, त्यानंतर तालुक्यातील जवळा (रु ) येथे शे.सलीम यांच्या शेतावरती चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, यावेळी श्री देशमुख आबासाहेब तालुका कृषी अधिकारी पालम, यांनी महाडीबीटी पोर्टल अंतर्गत सर्व शेतकरी योजनांची माहिती दिली, तसेच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त उपस्थित मान्यवरांनी, बाजरी, रागी, ज्वारी, नाचणी, आहारातील  महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले, त्यानंतर जवळा येथील पॅक हाऊस कामाची पाहणी करण्यात आली, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री देशमुख एम एस यांनी केले , हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी कृषी विभागातील श्री चव्हाण बी जी , श्री टकले आर बी,श्री पाटील शंकर, श्री बेले जीएम, श्री मतलाकुटे व्हि टी, श्री ठाकरे एन एस, तसेच गावातील शे सलीम, शेख युसुफ, व कृषी मित्र ज्ञानोबा कदम यांनी परिश्रम घेतले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या