💥दर्पण दिनी दैनिक लोकप्रश्न वृत्तपत्राचे पञकार महालिंग भिसे यांचा मुख्यंमंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान....!


💥नियमबाह्य शिक्षक भरती संदर्भात दैनिक लोकप्रश्न मध्ये प्रकाशित केलेल्या मालिकाची शासनाकडून दखल💥


परभणी (दि.०६ जानेवारी) - परभणी जिल्हातील खाजगी शिक्षण संस्थेत केलेल्या नियमबाह्य शिक्षक भरती संदर्भात दै.लोकप्रश्न मध्ये प्रकाशित केलेल्या मालिकाची दखल अप्रतिम मिडीयाने घेत पञकार महालिंग भिसे यांना शैक्षणिक क्षेञातील प्रथम पुरस्कार जाहिर केला होता आज दर्पण दिनी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंञी मा.एकनाथराव शिंदे यांचे महालिंग भिसे यांना ट्राफी सन्मानपञ देऊन सन्मानित केले आहे.

अप्रतिम मिडीयाचा वतीने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे आज दि.6 जानेवारी रोजी चौथास्तंभ पुरस्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता व्यासपीठावर ना.मुख्यमंञी एकनाथरावजी शिंदे अप्रतिम मिडीयाचे संचालक डॉ अनील फळे राधेशाम मोपलवार सिने अभिनेते व निर्माते मंगेश देसाई, विधिमंडळ व मंत्रालय वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर, तसेच विशेष गौरवमूर्ती एमएस आरडीसीचे उपाध्यक्ष व कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार, अतिरिक्त मुख्य सचिव नंदकुमार,विठ्ठल साखर कारखान्याचे प्रवर्तक अभिजीत पाटील,निमंत्रक विवेक देशपांडे आदी  उपस्थितीत होते.दर्पण पत्रकार दिना निमित्ताने गंगाखेड सारख्या तालुक्यात पत्रकारितेने राज्याच्या राजधानीत आपल्या कामाचा ठसा उमटविला कामाची दखल राज्याचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दै लोकप्रश्न चे तालुका प्रतिनिधी महालिंग भिसे याना चौथा स्तंभ विषेश पत्रकारितेचा राज्य स्तरावरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.त्यांनी परभणी जिल्ह्य़ात झालेल्या बोगस शिक्षक भरतीचा पर्दाफाश करुन आपल्या लेखणीच्या माध्यमातून हा मुद्दा लावुन धरुन त्या विषयीची एक मालीकाच चालवली आणी शिक्षणा सारख्या पवित्र क्षेत्रात सुरु असलेला भ्रष्टाचार चव्हाटय़ावर आणुन आपल्या लेखणीची ताकद समस्त महाराष्ट्राला दाखवुन दिली त्या लेखणीचा हा सन्मान आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या