💥स्वामी विवेकानंद जगाला मार्गदर्शन करणारे विद्यापीठ - सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.बाबासाहेब ठोंबरे


💥कृषि महाविद्यालय लातूर येथे राष्ट्रीय युवा सप्ताहचा समारोप💥

पुर्णा/ताडकळस (दि.१९ जानेवारी) : स्वामी विवेकानंद हे जागतिक तत्ववेत्ते होते. ते संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारे ते चालते बोलते विद्यापीठ होते असे मत कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी व्यक्त केले. कृषि महाविद्यालयात १२ ते १८ जानेवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने राष्ट्रीय युवक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. बुधवार दिनांक १८ जानेवारी रोजी सप्ताहाचे समारोपाचे आयोजन करण्यात आले. 


या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रत्नाकर बेडगे, पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे ,डॉ. विश्वनाथ कांबळे, डॉ. दिनेशसिंह चौहान, डॉ. प्रशांत करंजीकर, डॉ. ज्योती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. ठोंबरे पुढे म्हणाले की स्वामी विवेकानंदानी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी त्यांनी आपली विद्वत्ता उपयोगात आणली. १८९३ साली जागतिक धर्मपरिषदेत अवघे पदवीचे शिक्षण पूर्ण केलेल्या या व्रतस्थ साधकाने संपूर्ण जगाला आपल्या विद्वत्तेची प्रचिती आणून दिली. भारतातील जीवन जगण्याच्या पद्धतीला मन, धर्म आणि अध्यात्मिक संस्काराचे अधिष्ठान असल्याचे जगाला ठणकावून सांगितले. प्रमुख अतिथी डॉ. रत्नाकर बेडगे यांनी राष्ट्रमाता माॅ जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांंचे आदर्श व्यक्तीमत्व व  महान अध्यात्मिक विचारावर रासेयो च्या स्वयंसेवकाना मोलाचे मार्गदर्शन केले. श्री. गजानन भातलवंडे यांनी विद्यार्थ्यांना कर्मावर विश्वास ठेवत यश संपादन करण्याचे आवाहन केले तसेच पुढे असे प्रतिपादन केले की तरुणांनी स्वतःचा आत्मविश्वास प्रगल्भ करावा. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. दिनेशसिंह चौहान , सूत्रसंचालन कु. स्नेहल सपाटे आणि कु. श्रद्धा वसमतकर तर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिलकुमार कांबळे यांनी अभारप्रर्दशन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. विलास टाकणखार, डॉ. विठोबा मुळेकर, डॉ. व्यंकट जगताप, डॉ. राजेश शेळके, डॉ. अनंत शिंदे, डॉ. नितीन तांबोळी, डॉ. मकरंद भोगावकर, डॉ. दयानंद मोरे, डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर,डॉ. सुनिता मगर, डॉ. प्रभाकर अडसुळ, डॉ.शिवशंकर पोले, डॉ. विनोद शिंदे, डॉ. संघर्षकुमार श्रंगारे, डॉ. भगवान कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच अधिकारी, कर्मचारी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी ह्यांनी प्रात्यक्षिकांचा लाभ घेतला.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या