💥सायबर चोरट्यांकडून पैशांची मागणी,नागरिकांनी जागरूक राहत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन....!

💥वाशिममध्ये अश्याच प्रकारे थेट पोलीस अधीक्षकांच्या नावाचा गैरवापर करीत खोट्या व्हॉट्सॲप क्रमांकाद्वारे पैशांची मागणी💥 

फुलचंद भगत

वाशिम :- दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून सायबर चोरटे नव-नवीन क्लृप्त्यांचा वापर करून नागरिकांना गंडा घालण्याचे काम करत आहेत. वाशिममध्ये अश्याच प्रकारे थेट पोलीस अधीक्षकांच्या नावाचा गैरवापर करून खोट्या व्हॉट्सअॅप क्रमांकाद्वारे पैशांची मागणी केल्याचे समोर आले आहे.

          पोलीस स्टेशन मंगरूळपीर हद्दीतील एका गावच्या पोलीस पाटलांच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पोलीस अधीक्षकांच्या नावाचा गैरवापर करून पैश्यांची मागणी करणारे मॅसेज पाठवून सदर भामटा त्या पोलीस पाटलाला गंडविण्याचा प्रयत्न करत होता. परंतु त्या पोलीस पाटीलांच्या जागरूकपणामुळे त्यांनी त्वरित पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे जाऊन तक्रार केली. सदर प्रकरणी पो.स्टे.मंगरूळपीर येथे अप.क्र.२०/२३, कलम १७०, ४१९ भादंवि सहकलम ६६ (सी) माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम, २००८ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

     नागरिकांनी जागरूकता बाळगत अश्या प्रकारच्या अफवांना बळी पडू नये व शहानिशा केल्याशिवाय कुणालाही पैसे पाठवू नये आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे.


प्रतिनीधी:-

फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या