💥महाराष्ट्राच्या गतका खेळाडूंनी केली राष्ट्रिय स्पर्धेमध्ये १३ पदकाची कमाई....!


💥गतकापटुंनी १३ पदके जिंकून आपल्या राज्यासह परभणी जिल्ह्याचे देखील नाव उंचावण्याबरोबरच जिल्ह्याची शान वाढवली💥


परभणी (दि.२४ जानेवारी) -  पंजाबमध्ये झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील गतका स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या (मुली) गतकापटुंनी १३ पदके जिंकून आपल्या राज्याचे नाव उंचावण्याबरोबरच परभणीची शान वाढवली आहे.

दि.१९ ते २१ जानेवारी २०२३ दरम्यान पंजाब मधील  माता साहिब कौर गर्ल्स कॉलेज तलबंडी साबो भटिंडा (पंजाब) येथे झालेल्या १० व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या (मुली) गतका खेळाडूंनी 13 कांस्य पदके पटकावुन कमाई केली आहे. 


यावर  गतका असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे  सरचिटणीस अंभूरे पांडूरंग आनंद व्यक्त करत म्हणाले की, या स्पर्धेमध्ये 17 राज्यांनी व 400 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये महाराष्ट्राला सब ज्युनिअर ,ज्युनियर व सीनियर मध्ये सिंगल शोटी  मध्ये, फरी शोटी मध्ये 13 पथकाची कमाई करत महाराष्ट्राचे नाव पंजाब राज्यामध्ये मध्ये  केले  आहे.

सब ज्युनिअर मुली ,ऋतुजा बनसोडे, दिव्या घोडके, हर्षा वलेच्या, प्रज्ञा पद्मावत, ज्युनिअर मुली गायत्री वकोडिकर, सीमा खीस्ते, निकिता वैद्य, मानशी कोल्हे, विजयालक्ष्मी पिंपरीकर आणि सीनिअर मुली सृष्टी अंभुरे, आश्र्विनी देवकर, श्रद्धा घोडे या मुली गतकापटुंनी सहभाग घेतला होता. या सर्व खेळाडूंनी मास्टर पांडूरंग अंभुरे यांचे मार्गदर्शनाखाली विजय प्राप्त केला आहे.

या सर्व विजेत्यांवर, नॅशनल गतका असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष हर्जित  सिंग गरेवाल, सदस्य.बलजीत सिंग सनी , अजितदादा वरपूडकर ,विकी नारवानी, मदन (बापू) कोल्हे,मंदार कुलकर्णी , देवानंद वाकळे,मयुर मोरे -देशमुख ,पंकज सोनी ,विश्वनाथ तिखे,दत्ता गरुड, सूर्यकांत मोगल, सुरेश कदम ,रमेश शिर्के सह परभणीवासियांतर्फे अभिनंदनाचा वर्षाव होत  असून सर्वत्र विजयी गतकापटु मुलिंचे कौतुक करण्यात येत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या