💥राज्यासह परभणी जिल्ह्यातील वीज कर्मचार्‍यांचा तिन दिवसीय संप अखेर मागे.....!


💥जिल्ह्यातील विज ग्राहक नागरीकांनी घेतला सुटकेचा निःश्‍वास💥

परभणी (दि.04 जानेवारी) : महावितरण कंपनीतील संपावर गेलेल्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी उर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चेनंतर समाधानकारक तोडगा निघाल्याने आज बुधवार दि.04 जानेवारी 2023 रोजी दुपारी काही तासानंतर आपला तीन दिवशीय संप मागे घेतला.

          महावितरण, महापारेषण व महानिर्मिती या तीन कंपन्यांच्या संभाव्य खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात अधिकारी-कर्मचारी संघर्ष समितीने मंगळवारी मध्यरात्री 12 वाजेपासून तीन दिवशीय संप सुरु केला होता. 72 तासातील या संपा दरम्यानच बुधवारी दुपारी उर्जामंत्री फडणवीस यांनी या संघटनेच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा केली. तीनही कंपन्यांचे कुठल्याही प्रकारचे खाजगीकरण होणार नाही. उलट पुढील तीन वर्षात या तीनही कंपन्यांमध्ये 50 हजारांची मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जाईल, असे ठोस आश्‍वासन दिले. त्यामुळे 30 विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या ठोस आश्‍वासनानंतर तीन दिवशीय हा संप मागे घेतला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या