💥हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या कापडसिंगी येथे आज पासून भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन....!


💥यात्रे निमित्त आज १२ जानेवारीला सकाळी श्री संत रेखे बाबा मंदिरात विशेष पूजा करण्यात आली💥

शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील कापडसिंगी येथे आज पासून दि १२ जानेवारीपासून श्री संत रेखेबाबा महाराज वार्षिक यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे १२ जानेवारीला सकाळी श्री संत रेखे बाबा मंदिरात विशेष पूजा करण्यात आली सायंकाळी 'श्री'ची पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्याच दिवशी भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ जानेवारी रोजी दुपारी मंदिर परिसरात भजन स्पर्धा होणार आहे. १

४ आणि १५ जानेवारीला कबड्डी स्पर्धा, १६ व १७ जानेवारीला शंकरपट, १८ जानेवारीला स्लो मोटार सायकल स्पर्धा तर १९ जानेवारीला पुरुष आणि महिलांसाठी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेनिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्यांना सुमारे दोन लाख रुपयांपर्यंतच्या बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. यात्रा यशस्वितेसाठी गावातील नागरिकांनी विविध समित्या स्थापन केल्या आहेत.यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ही यात्रा जवळपास पंधरा दिवस चालणार आहे. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सर्व स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन गावकऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या