💥परभणीचे दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी सुरज कदम यांना कै.कृष्णाराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान...!


💥नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पुरस्कार💥

परभणी (दि.09 जानेवारी) - परभणी येथील दैनिक देशोन्नतीचे जिल्हा प्रतिनिधी तथा पत्रकार सुरज कदम यांना नाशिक येथील श्री कालीका देवी मंदीर संस्थान व क्रिडा सांस्कृती फाऊंडेशनच्या वतीने दिला जाणारा कै.कृष्णाराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी.शेखर पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

शुक्रवार ६ जानेवरी रोजी दर्पण दिना निमित्त नाशिक येथील कालीका मंदीर सभा गृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.पाटील, संस्थेचे श्री कालीका मंदीर संस्थानचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, कोषध्यक्ष सुभाष तळाजीया, सचिव डॉ.प्रतापराव कोठाळे यांच्या हस्ते दै.देशोन्नतीचे परभणीचे पत्रकार कदम यांना प्रदान  करण्यात आला.या प्रसंगी त्यांच्या पत्नी शुभांगी  कदम, सुधांशु कदम हे उपस्थित होते.  या प्रसंगी व्यासपीठावर आयोजन समिती अध्यक्ष अशोक दुधारे,सचिव आनंद खरे,क्रिडा संस्कृती फऊंडेशनचे सचिव उदय खरे, दिपक निकम यांची उपस्थीती होती. कदम हे मागील २२ वर्षा पासुन पत्रकारीता श्रेत्रात लेखनीच्या माध्यमातुन सर्व सामान्याच्या प्रश्नावरुन आवाज उठवण्याचे काम करत आहेत.  त्यांना आत्ता पर्यंत उत्कृष्ट पत्रकारीते बद्दल अनेक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातुन अभिनंदन होत आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या