💥जिंतूर येथे प्रवासी महासंघांच्या पदाधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहात बैठक संपन्न....!


💥जिंतूर आगार प्रमुख यांना भेटून आगारातील समस्येबाबत चर्चा केली💥

जिंतूर प्रतिनिधी /  बी.डी. रामपूरकर

जिंतूर येथे आज दिनांक 21 जानेवारी रोजी प्रवासी महासंघांची तालुका पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन या बैठकीच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा प्रवासी महासंघाचे अध्यक्ष के.डी. वर्मा हे होते .तर ग्राहक सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गुलाबराव शिंदे उपस्थित होते.


झालेल्या बैठकीत 28 जानेवारी रोजी रथसप्तमी दिनी प्रवासी दिनानिमीत्ताने आयोजन करण्यात यावे. या साठी प्रवासी महासंघाचे सर्व पदाधीकारी,त्याच बरोबर जिंतूर तालुका ग्राहक मंचचे सर्व पदाधिकारी व महिला सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हान त्यांनी केले.यानंतर सर्व पदाधिकारी यांनी जिंतूर बस आगार प्रमुखांची भेट घेऊन बस आगारातील समस्येविषयी सविस्तर चर्चा केली त्यामध्ये , ज्येष्ठ नागरिक महिला व अपंगांसाठीच्या राखीव जागा साठी वाहक यांनी  प्रवाशास मदत करावी,

उन्हाळा समोर असल्याने बस स्थानकातील पाणी बॉटल साठी दर निश्चित करावे व त्याच दराने विक्री करण्यात यावी, बस स्थानकातील स्वच्छता वेळोवेळी करण्यात यावी,शौचालयात  स्वच्छता व दरपत्रक असावे,बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी (महिला व पुरुष) असावा बस स्थानकात दर्शनी बस वेळापत्रक लावावे,तसेच बसमध्ये विक्रेत्यांनी जाऊन विक्री करण्यावर प्रतिबंध करावा जेणेकरून प्रवाशांना अडचण होणार नाही आदी अनेक बाबीवर चर्चा झाली व त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे आगार प्रमुख श्री विश्वनाथ  चिभडे यांनी सांगितले.

यावेळी प्रवासी महासंघाचे पदाधिकारी के.डी. वर्मा जिल्हाध्यक्ष, सचिन रायपत्रीवार  तालुकाध्यक्ष,अँड. पंकज तिवारी सचिव, बी.डी. रामपूरकर तालुका कार्याध्यक्ष, महेश देशमुख तालुका कोषाध्यक्ष, संदीप माहूरकर, अर्जुन पालवे, अमरजीत राठोड, किशोर पारडे, गुलाबराव शिंदे तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायत आदी पदाधिकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या