💥डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटने कडून जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा...!


💥स्पर्धेत नाव नोंदणीची अंतिम तारीख २० जानेवारी २०२३ असेल💥

डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या युवक संघटनेकडून संविधान दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त येत्या रविवारी २२ जानेवारी रोजी जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र नोंदणीची अंतिम तारीख २० जानेवारी असेल.


           डी वाय एफ आय या युवा संघटनेनी संविधान दिन व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी-युवा व नागरिकांमध्ये संविधानाची मूल्ये व प्रजासत्ताक दिनाचे महत्व काय याची जाणीव-जागृती व्हावी या उद्देशाने या निबंध स्पेधेचे आयोजन केले आहे. स्पर्धा शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला गट अशा तीन गटात होईल. प्रत्येक गटाला प्रत्येकी २ बक्षीसे आहेत ज्यात प्रथम ₹२००० व द्वितीय ₹१००० रकमेचा समावेश आहे व सोबत प्रमाणपत्र ही देण्यात येणार आहेत. या स्पर्धेसाठी गटानुसार विषय देण्यात आले आहेत. शालेय गट- 'स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांचे योगदान', महाविद्यालयीन गट- 'भारतीय संविधान- स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा श्रेष्ठ ग्रंथ' आणि खुला गट- 'घटनात्मक मूल्ये व आजची आव्हाने आणि युवकांची भूमिका'.  ही स्पर्धा संपूर्ण परभणी जिल्ह्यासाठी असून परभणी, मानवत, सेलू आणि पूर्णा या चार ठिकाणी स्पर्धेचे केंद्र असणार आहे. पूर्णा तालुक्यासाठी स्पर्धेचे केंद्र पूर्णेतील डॉ. आंबेडकर स्मारक हायस्कुल हे असणार आहे. सर्व स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असे नम्र आवाहन डी वाय एफ आय कडून करण्यात आले आहे.....


पूर्णा तालुक्यासाठी संपर्क:

अमन- ८५५१८७२६६०, विश्वा- ९१५८२३०७०१, राज- ७७७६८०६०८२

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या