💥पुर्णेत प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी २१ व्या संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन....!


💥या भव्य संविधान गौरव सोहळ्यास पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी महाथेरो यांचे मार्गदर्शन लाभणार आहे💥

पुर्णा (दि.२३ जानेवारी) :  प्रजासत्ताक दिनी भारतीय संविधान गौरव समितीच्या वतीने प्रतीवर्षा प्रमाणे याही वर्षी येत्या २३ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भव्य संविधान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावर्षी संविधान गौरव सोहळ्याचे २१ वे वर्ष असून या भव्य संविधान गौरव सोहळ्यास पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी महाथेरो यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


पूज्य भदंत डॉ उपगुप्तजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या  भव्य संविधान गौरव सोहळ्यास प्रमुख पाहुणे व वक्ते संविधान फाऊंडेशन चे प्रमुख विचारवंत,माजी सनदीअधिकारी मा.इ.झेड.खोब्रागडे,नागपूर हे मार्गदर्शन करणार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष पद पूर्णा येथील जामा मशिदीचे पेश इमाम मा.

मौलाना शमीम अहमद रिजवी हे भूषविणार आहेत.या कार्यक्रमाचे उदघाटन  पूर्णा नगरीचे अध्यक्षाचे प्रतिनिधी मा.संतोष एकलारे यांचे शुभास्ते होणार असून या कार्यक्रमाला सत्याग्रही महाविद्यालयाचे प्रा.डॉ.जी.के.डोंगर गावकर,मुंबई हे मार्गद्शन करणार आहेत.या प्रसंगी स्टार प्रवाह च्या सुप्रसिद्ध बाल गायिका कुमारी प्रांजल बोदक,परभणी यांचा सत्कार या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष प्राचार्य केशव जोंधळे यांचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक मा.प्रकाश कांबळे दिली असून संविधान गौरव सोहळ्याचे समितीने या दिनी,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे सकाळी १०-०० वाजता ध्वजारोहण,दुपारी १२-०० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची शहरभर मिरवणूक, व त्यानंतर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे सन्मान करण्यात येणार आहेत.तरी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे गौरव समितीचे पदाधिकारी मा.प्रा.अशोक कांबळे,प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले,अशोक कांबळे, ॲड सईद, ॲड.हर्षवर्धन गायकवाड,उत्तंभैय्या खंदारे, ॲड धम्मदीप,जोंधळे,विजयकुमार जोंधळे,गौतम काळे, प्रा.डॉ प्रकाश मोगले,रौफ कुरेशी,अनिल खार्गखराटे,भारत जोंधळे,मोहन लोखंडे,शिवाजी वेडे,किशन ढगे,बाळासाहेब राऊत,श्रीकांत हिवाळे,दादाराव पंडित,मुकुंद पाटील,सुनील जाधव,त्रिंबक कांबळे,राम धबाले, सिद्धार्थ भालेराव,विनोद कणकुटे,मनोज खिल्लारे, ॲड.सूर्यकांत काळे,दिलीप गायकवाड,श्यामराव जोगदंड,राजकुमार सुर्यवंशी, पंडित डोंगरे, विरेष कसबे, नागेश येंगदे,भूषण भुजबळ,लक्ष्मीकांत शिंदे,आखिल अहमद,गौतम मुळे,गौतम कांबळे,आदि मान्यवरांनी केले आहे....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या