💥परभणीत ७३ वर्षीय वृध्द इसमाना गळा आवळून खून : मृतदेह फेकला कालव्यात....!


💥नवामोंढा पोलिस स्थानकात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल💥

परभणी (दि.१६ जानेवारी) : परभणी शहरातील लोकमान्य नगर परिसरात राहणारे ७३ वर्षीय ज्येष्ठ नागरीक दिलीप लक्ष्मणराव वैद्य यांचा मृतदेह शनिवार दि.१४ जानेवारी २०२३ रोजी दुपारी जायकवाडीच्या कालव्यात आढळून आला होता परंतु सदरील वृध्दाचा गळा आवळून अज्ञात व्यक्तींनी खून करीत मृतदेह कालव्यात टाकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर नवामोंढा पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.

         आशिर्वाद नगरातील देवीच्या मंदिरात दर्शनाकरीता जावून येतो म्हणून घराबाहेर पडलेल्या वैद्य यांचा कुटूंबियांसह नातेवाईकांना थांगपत्ता लागत नव्हता, अखेर मोंढा पोलिस ठाणे गाठून अमित वैद्य यांनी तक्रार दाखल केली. त्याआधारे नवामोंढा पोलिसांनी तपास सुरु केला तेव्हा शनिवारी दुपारी बलसा शिवारातील कालव्यात वृध्दाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी ओळख पटविली तेव्हा तो मृतदेह दिलीप वैद्य यांचाच असल्याचे निष्पन्न झाले. गळा आवळून वैद्य यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिस निरीक्षक संदीपान शेळके यांनी अज्ञात व्यक्तींविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या