☀️चिखली तालुका पत्रकार संघाकडून दर्पण दिन उत्साहाने साजरा : पत्रकार संघाने नव्या,जुन्या पत्रकारांचा केला गौरव...!


☀️तालुका पत्रकार संघातर्फे जीवन गौरव आणि स्व.गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्काराचे करण्यात आले वितरण☀️


 ✍️ मोहन चौकेकर 

चिखली : चिखली तालुका पत्रकार संघातर्फे दि. ६ जानेवारी रोजी दर्पण पत्रकार दिन साजरा करण्यात आला . हाँटेल देव्हडे रेसिडेंसीमध्ये आयोजित या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार वसंत पाराशर यांना पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार आणि कृष्णा सपकाळ यांना स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्काराचे वितरण आ. श्वेताताई महाले, माजी आमदार राहुल बोंद्रे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे , व्हाईस आँफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल म्हस्के, माजी जि. प. सभापती डॉ. ज्योतीताई खेडेकर, श्रीमती सरला गिरीश दुबे, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, मनसेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, माजी नगरसेवक सचिन बोंद्रे, भाजप अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष शेख अनीस , सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे, नगर पालिकेचे उपमुख्याधीकारी धनंजय इंगळे या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. 


☀️चिखली तालुक्यातील पत्रकारिता जिल्ह्यात अग्रेसर - आ. श्वेताताई महाले

बुलढाणा जिल्ह्याची आर्थिक राजधानी म्हणून चिखली तालुक्याची ओळख आहे. ही ओळख केवळ राजकीय क्षेत्रापुरती नसून पत्रकारिता क्षेत्रात सुध्दा जिल्हा पातळीवर चिखली तालुक्यातील पत्रकारांनी आपला लौकिक निर्माण केला आहे असे मत आ. श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले. पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आपण सदैव तत्पर असू अशी ग्वाही आ. श्वेताताई महाले यांनी यावेळी दिली.

☀️लोकशाहीच्या रक्षणात पत्रकारांची भूमिका महत्त्वाची - माजी आमदार राहुल बोंद्रे

स्वतंत्र आणि सार्वभौम भारतात लोकशाहीचे चार महत्त्वाचे खांब आहेत. यापैकी  चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकारांची भूमिका लोकशाहीच्या रक्षणासाठी अतिशय महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले. चिखली तालुका पत्रकार संघाकडून ही भूमिका चोखपणे निभावली जात असल्याबद्दल राहुल बोंद्रे यांनी पत्रकारांचे कौतुक केले.

☀️पत्रकार संघाने नव्या,जुन्या पत्रकारांचा केला गौरव :-

गेल्या सात वर्षांपासून चिखली तालुका पत्रकार संघातर्फे पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असलेल्या पत्रकारास पत्रकारिता जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. यावर्षी मेहकर येथील ज्येष्ठ पत्रकार वसंत पाराशर यांना हा पुरस्कार देण्यात आला. याशिवाय युवा पत्रकारांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने यावर्षी पासून स्व. गिरीश दुबे नवपत्रकारिता पुरस्कार सुरू करण्यात आला. या पुरस्काराचे पहिले मानकरी ठरलेले  कृष्णा सपकाळ यांना देखील मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. वसंत पाराशर आणि कृष्णा सपकाळ यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना कृतज्ञता व्यक्त केली.

अ. भा. मराठी पत्रकार परिषदचे राज्य उपाध्यक्ष राजेंद्र काळे आणि व्हाईस आँफ मिडियाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल म्हस्के यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. दोघांनी आपल्या भाषणातून पत्रकारितेतील सद्यस्थितीतवर भाष्य करत पत्रकार कल्याण बहुउद्देशिय संस्था, चिखली आणि चिखली तालुका पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले. चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश शर्मा यांना  नाशिक येथील श्री कालिका देवी मंदिर संस्थान व क्रीडा संस्कृती फाउंडेशन नाशिक यांचे संयुक्त विद्यमाने  पत्रकार दिनानिमित्त कै. कृष्णराव पाटील कोठावळे राज्यस्तरीय पुरस्कार काल नाशिक येथे प्रदान करण्यात आला. यानिमित्त त्यांचा देखील  सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. या प्रसंगी ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, माजी जि. प. सभापती डॉ. ज्योतीताई खेडेकर व माजी नगरसेवक सचिन बोंद्रे यांनी देखील आपले विचार मांडले. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी देखील कार्यक्रमस्थळी येऊन पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. नायब तहसीलदार हरी वीर,  जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संजय खेडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती डॉ. सत्येंद्र भूसारी, भाजप तालुकाध्यक्ष कृष्णकुमार सपकाळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक, मुस्लीम सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शेख करामात यांनी देखील भेट देऊन पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास गाडेकर यांनी तर सूत्रसंचालन रेणुकादास मुळे यांनी केले. उपाध्यक्ष कमलाकर खेडेकर यांनी आभार मानले. पत्रकार संघाचे सचिव तौफिक अहमद, सहसचिव इम्रान शहा, कोषाध्यक्ष छोटू कांबळे, संघटक नितीन फुलझाडे यांच्यासह संतोष लोखंडे, कैलास शर्मा, नितीन गुंजाळकर, मोहन चौकेकर , इफ्तेखार खान, रवींद्र फोलाने, महेश गोंधणे, रमाकांत कपूर, भिकू लोळगे, सत्य कुटे, शेख  साबीर, राजेंद्र सुरडकर, रमिझ राजा, सय्यद साहिल आणि भारत जोगदंडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला. माजी नगरसेवक गोविंद देव्हडे आणि रणजीत देव्हडे यांची मोलाची मदत या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी झाली.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या