💥विद्यार्थीनींनी रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यात योगदान द्यावे....!


💥असे आवाहन उपपरिवहन विभाग परभणी सहायक निरीक्षक विकास नाईकवाडे यांनी केले💥

       आजच्या गतिमान व गर्दीच्या जगात वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळावे.रस्तासुरक्षा जनजागृती कार्यात पादचारी लोकांच्या रक्षणार्थ काळजी घेत नियमानुसार वाहन चालविले पाहिजे.वाहतुकीनं जीवन सुसाह्य आणि सुखावह झाले आहे.नियमबाह्य वर्तन टाळत नियमानुसार लायसन्स,वाहनाची नियमीत तपासणी करून जीवनातील अपघात टाळण्याचा सर्वांनीच प्रयत्न केला पाहिजे.स्वत:सह इतरांची काळजी घेत अपघातमुक्त जीवनशैली विकसित करावी,असे आवाहन उपपरिवहन विभाग परभणी सहायक निरीक्षक विकास नाईकवाडे यांनी केले.

     कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी राष्ट्रीय सेवा योजना विभाग, उपविभागीय परिवहन अधिकारी,कार्यालय, आणि ओम ड्रायव्हिंग स्कूल परभणी च्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान प्रसंगी  विकास नाईकवाडे बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर सहायक निरीक्षक धोंडीबा ढगे,आश्विन सोनकांबळे,उपप्राचार्या डॉ. संगीता आवचार ,प्रा.निर्मला जाधव,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. अरुण पडघन,प्रा डॉ.नसिम बेगम ,ओम ड्रायव्हिंग स्कूल परभणी चे ओंकार कवटकवार यांची उपस्थिती होती या प्रसंगी प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांनी मान्यवरांचे स्वागत केले.वाहन चालवताना रस्ताच्या डाव्या बाजूने तर पादचाऱ्यांनी उजव्या बाजूने चालावे.आधुनिक जीवनातील धोके टाळत आपले जीवन सहज, सुंदर बनवावे असे मत सहाय्यक निरीक्षक आश्विन सोनकांबळे यांनी मांडले.

         वाहन चालकांनी घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करत तुम्ही सर्वांनी ड्रायव्हींग चे प्रशिक्षण घेऊन लोकजीवनात रस्ता सुरक्षा जनजागृतीचे कार्य करीत लोकप्रबोधन रासेयो विद्यार्थिनीनी करावे.असे मत मांडत धोंडीबा ढगे यांनी उपस्थितांना शपथ दिली.यावेळी उपस्थितांना रस्ता सुरक्षा माहिती पुस्तिका भेट म्हणून देण्यात आली.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.अरुण पडघन यांनी केले.तर आभार प्रा.महेश जाधव यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या