💥वाशिम ग्रामीण पोलिस स्थानकाच्या हद्दीतील राजगांव येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर धाड....!


💥पोलिस पथकाने टाकलेल्या धाडीत ३०,०००/- रुपयांचा मुदेमाल जप्त💥

(फुलचंद भगत)

वाशिम:-नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक असलेल्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची साठवणुक, विक्री व वाहतुक करण्यावर शासनाने प्रतिबंध केला असुन देखील काही इसम छुप्या मार्गाने तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांची साठवणुक विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न करतात. अशा आरोपीविरुध्द कडक कायदेशिर कारवाई करण्याचे आदेश मा. पोलीस अधीक्षक, श्री. बच्चन सिंह (IPS) यांनी दिले आहे.

त्या अनुषंगाने दि. २६/०१/२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय वाशिम यांचे पथकाने महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिबंधित असलेल्या वेगवेगळया कंपनीचा गुटखा पो.स्टे. वाशिम ग्रामीण हददीतुन ३०,४५९/- रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिलकुमार पुजारी यांना गुप्त बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे वाशिम ग्रामीण हददीतील ग्राम राजगांव येथे गजानन किराणाची तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला वेगवेगळया कंपनीचा गुटखा जप्त केला आहे. सदर धाडीमध्ये आरोपी गजानन पवार यांचे कडनु सुंगधित तबाखु अं.किं.३०,४५९/- रुपयांचा मुद्येमाल जप्त केला आहे. सदर आरोपीवर पो.स्टे. वाशिम ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशिर कारवाई सुरु आहे.सदरची कारवाई मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सा. सुनिलकुमार पुजारी, उपविभाग वाशिम यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि राहुल चौधरी, मपोहेकॉ/ सुवर्णमाला मोरे, पोकॉ/ महादेव भिमटे,पोकॉ/ अभिजित बांगर, पोकॉ/स्वप्निल शेळके, पोकॉ/मनिष बिडवे यांनी पार पाडली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरूळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या