💥जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात मशाल रॅलीचे स्वागत....!


💥यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रॅली स्वागत केले💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

जिंतूर (दि.२५ जानेवारी) - जिंतूर येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मशाल रॅलीचे आगमन दुपारी तीन वाजता महाविद्यालयात झाले .यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीधर भोंबे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी रॅली स्वागत केले.


रॅलीचे आगमन होताच महाविद्यालयाचा परिसर जयहिंद ,वंदे मातरम ,भारत माता की जय या घोषणांनी निनादून गेला होता. त्यानंतर सदरील मशाल प्राचार्य डॉ श्रीधर भोंबे यांनी घेऊन महाविद्यालयात आणली. यावेळी दुतर्फा उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांनी घोषणा देत रॅलीचे स्वागत केले . सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना मशाल रॅलीचे समन्वयक प्रा डॉ जयंत बोबडे, प्रा डाॅ प्रल्हाद भोपे,प्रा डॉ सचिन खडके, प्रा डॉ दिगंबर रोडे यांनी रॅलीचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली. रॅली सोबत आलेल्या स्वयंसेवकांनी महाविद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्यवीरांचे चित्र प्रदर्शन विद्यार्थ्यांना पाहण्यासाठी आयोजित केले होते. रॅलीच्या स्वागतासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य एम एस दाभाडे ,प्रा डॉ डी पी कोतवाल ,प्रा पांडुरंग निळे, प्रा .प्रल्हाद पिसाळ ,डॉ बी जी ठाकरे, प्रा. नारायण शिंदे, कार्यालय अधीक्षक चंद्रकांत पत्तेवार, प्रा रमेश  रणसिंग, प्रा श्रावण कांबळे, प्रा संतोष कदम ,प्रा डाॅ संतोष जाधव, प्रा.नयना रत्नपारखी ,प्रा डाॅ अशोक वैद्य, प्रा डाॅ उत्तम डोलारे ,प्रा शेखर भड,प्रा डॉ शिरीष  रुद्रवार, प्रा डॉ शाम गोरे ,प्रा सुनील गवई, बालासाहेब जाधव आदीसह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या