💥पुर्णा तालुक्यातील माखणी येथे श्री.संत गजानन महाराज मुर्ती प्राणप्रतिष्ठान संपन्न....!


💥यावेळी सर्वप्रथम गावामध्ये संत गजानन महाराज यांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली💥

ताडकळस/प्रतिनिधी 

पुर्णा (दि.२८ जानेवारी) - पुर्णा तालुक्यातील ताडकळस लगत असलेल्या माखणी येथे श्री संत गजानन महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठान स्थापना करण्यात आली.  

यावेळी सर्वप्रथम गावामध्ये संत गजानन महाराज यांच्या मुर्तीची मिरवणूक काढण्यात आली तद्नंतर पूजा करण्यात आली व गणपती पूजन दिप पूजन संपूर्ण होम हवन करून सायंकाळी महाआरती प्रल्हाद आवरगंड व शारदा आवरगंड सपत्नीक यांच्या हस्ते करण्यात आली व श्री गजानन महाराज यांचा महा अभिषेक करून पूजा होम हवन प्राणप्रतिष्ठा ब्राह्मण वृंदावनी  प्राणप्रतिष्ठा पूर्ण करण्यात आली नंतर महाप्रसाद करण्यात आला या कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माखणी गावातील युवा ,वृद्ध ,महिला व समस्त गावकरी मंडळींनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या