💥कुपटा येथील ज्ञानोपासक विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम संपन्न....!


💥सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले💥

ज्ञानोपासक विद्यालय कुपटा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त  कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष  मु.अ.श्री तलवारे आर पी  उपस्थित होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री शेख सर,श्री शिंदे सर,श्री चरचरे सि के,श्री इंगळे एस पी,उपस्थित होते. सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. 


यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तसेच शाळेतील काही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या महापुरुषाविषयी वेशभूषा केली होती. व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर नाटिका पण सादरीकरण करण्यात आले अध्यक्षीय समारोपात  मुअ श्री तलवारे आर पी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनाविषयी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील श्री कपाटे डी के, श्री अंभोरे पी एस, श्री गोरे सर, श्री राऊत आर एम, श्री पवार एस एफ, श्री घुगे आर् बी, श्री चट्टे यु व्ही, श्री पवार व्ही बी, श्री शिंदे जे पी, श्री अनिल शिंदे, श्री सदावर्ते, श्री भोसले, श्री पाडळसे सौ गिरी मॅडम  , श्री उपलवाडा, श्री राऊत , श्री घोडके, श्री गिरी इत्यादींनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या