💥जानेवारीत 'हे' चित्रपट-वेबसीरिज होणार रिलीज ; कुठे पाहता येणार, वाचा...!


💥प्रेक्षकांना ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट पाहायला मिळू शकतात💥

 ✍️ मोहन चौकेकर

नवीन वर्षात आणि वर्षाच्या पहिल्या म्हणजेच जानेवारी महिन्यात प्रेक्षकांना ओटीटीवर अनेक वेब सीरिज आणि चित्रपट पाहायला मिळू शकतात. नेमकं कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर कोणकोणते चित्रपट आणि वेबसीरिज रिलीज होणार आहेत ते पाहू..

'मिशन मजनू' :-

बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा 'मिशन मजनू' हा भारत-पाकिस्तानवर आधारित चित्रपट येत्या 20 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलरही रिलीज झालेला आहे.

झांसी - 2 :-

'झांसी सीझन 2' ही वेब सीरिज काही दिवसांतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज या आठवड्याममध्ये 19 जानेवारीला Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.

छत्रीवाली :-

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा 'छत्रीवाली' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात रकुल जीवशास्त्राच्या शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. 20 जानेवारीला रकुलचा छत्तरीवाली चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

 एटीएम :-

क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर असणारी 'एटीएम' ही वेबसीरिज अनेकांना आवडणारी असू शकते. लोक या वेबसीरिजची उत्सुकतेने वाट बघत असून एटीएम वेबसीरिज तामिळसह तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज 20 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE-5 वर रिलीज होणार आहे.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या