💥परभणी तालुक्यातील पिंगळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत माता पालक मेळाव्यासह हळदी कुंकुवाचा कार्यक्रम संपन्न...!


💥राष्ट्रमाता माँ जिजाऊ महोत्सव,सावित्रीबाई फुले जयंती,मकरसंक्रातीचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन💥

परभणी/ तालुक्यातील पिंगळी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत आज बुधवार दि.18 जानेवारी 2022 रोजी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले,राष्ट्रमाता माँ जिजाऊ महोत्सव,प्रजासत्ताक दिन,मकरसंक्रात चे औचित्य साधून माता पालक मेळाव्यासह हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आयोजित केला होता भरपूर संख्येने माता पालक उपस्थित होत्या तसेच डॉ.तिलोतमा काळे व डॉ.सीमा हिंगे यांनी किशोरवयीन मुली व महिलांना "आरोग्याची काळजी" कशी घ्यावी  यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले ; महिला माता पालक यांच्या साठी टिकली लावणे,प्रश्न मंजुषा, वैगेरे खेळ घेऊन त्यांना विशेष बक्षिसे वितरित करण्यात आली या कार्यक्रम साठी शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष श्री गोविंदरावजी गरुड ,प्रल्हाद गरुड,मु श्री विनोद बोरसे यांनी प्रतिमेचे पूजन  व करून कार्यक्रमाची सुरुवात केली यासाठी सौ औंढेकर मॅम,सौ मरवालीकर मॅम, सौ तोरंबेकर  मॅम,श्री जाधव सर,श्री खके सर,श्री आवरगंड सर,घाटोळे बाई, गव्हाणे बाई  व विद्यार्थिनी सर्वांनी सहकार्य केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या