💥वाशिम जिल्ह्यात पोलिस प्रशासनाची प्रतिबंधीत अवैध गुटखा विक्री विरोधात धडक कारवाई....!


💥पोलिस दलाने केलेल्या धडक कार्यवाहीत १३,९५,९२०/- रुपयांचा मुददेमाल जप्त💥

(फुलचंद भगत)

वाशिम (दि.१८ जानेवारी) :- समाजात शांतता व सुव्यवस्था राहावी त्याचबरोबर अवैध धंदयावर प्रतिबंध व्हावा यासाठी वाशिम जिल्हा पोलीस दलात तर्फे सतत कार्यवाही सुरु असतात त्याच पार्श्वभुमीवर वाशिम जिल्हयात अवैधरित्या गुटखा विक्री करणाऱ्यांना पायबंद घालण्याकरिता जिल्हयात विशेष मोहिम राबविण्यात आली.त्या अनुषंगाने दिनांक १८/०१/२०२३ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंगरुळपीर यांच्या पथकाने महाराष्ट्र शासनाकडुन प्रतिबंधीत असलेल्या वेगवेगळया कंपणीचा गुटखा पो.स्टे.मंगरुळपीर हददीत कसाबपुरा येथे १३,९५,९२०/- रु. चा गुटखा जप्त केला व आरोपी १. अबरार अहमद मोहम्मद खान वय ३२ वर्ष रा. डाखणीपुरा कारंजा २. अहमद बेग मुजफफर बेग वय ३५ वर्ष रा. कसाबपु रा मंगरुळपीर ३. अब्दुल रशीद अब्दुल सलाम वय ४२ वर्ष रा. टेकडीपुरा मंगरुळपीर या आरोपीतांना कार्यवाहीमध्ये अटक करण्यात आली आहे.

तसेच गुन्हयातील फरार आरोपी क्र. ४ नामे मुददसीर खान रा. कारंजा ५. मोहम्मद इब्राहिम अब्दुल सलाम वय ३४ वर्ष रा.टेकडीपुरा व क्र.६.वाहन मालक अब्दुल शाकीर अब्दुल रउफ रा. बिबिसापुरा कारंजा यांनी विक्रीकरिता बाळगलेला गुटखा व तत्सम पदार्थ हे लोकांच्या जिवीतास अपायकारक असल्याने महाराष्ट्र शासनाने विक्री व बाळगणे व वाहतुकीस प्रतिबंध घातले असल्याचे माहित असुन सुध्दा वरील आरोपीतांनी नमुद गुटखा, मुददेमाल विक्री करण्याच्या उददेशाने बाळगल्याने सदर आरोपीतांविरुध्द पो.स्टे.मंगरूळपीर येथे गुन्हे दाखल केले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री. बच्चन सिंह (IPS) यांच्या मार्गदर्शनाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जगदीश पांडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय मंगरुळपीर येथील पोकॉ/३५१ ईस्माईल कालीवाले, पोकॉ/८८ मंगेश गादेकर व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय कारंजा येथील पोहेकॉ/९५३ फिरोज, चालक नापोकॉ/८८९ सुनिल चव्हाण व नापोकॉ/९४५ अमित वानखडे व तसेच पो.स्टे.मंगरुळपीर येथील सपोनि/निलेश शेंबळे पो.स्टे.मंगरूळपीर, मपोकॉ/१२७६ सुप्रीया डोंगरे,चालक पोहेकॉ/६७९ नागोराव राठोड या अंमलदारांच्या पथकाने पार पाडली.मा. पोलीस अधिक्षक वाशिम श्री.बच्चन सिंह (IPS) यांनी सर्व जनतेस सुजान नागरिक या नात्याने अशा प्रकारची काही तक्रार असल्यास नियंत्रण कक्षास माहिती दयावी. त्या इसमाचे नाव गोपणीय ठेवण्यात येईल असे आव्हान केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या