💥हिंदुहृदय सम्राट स्व.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव प्रेरणा देतील : आ.डॉ.राहूल पाटील


💥स्व.शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि.२३ जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आले💥

परभणी (दि.23 जानेवारी) - हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सांगणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील आसे मत शिवसेनेचे आमदार डाँ.राहुल पाटील यांनी म्हटले मुंबईसह महाराष्ट्रातील मराठी माणसांना स्वाभिमानाने जगता यावे यासाठी त्यांनी शिवसेना ही संघटना स्थापन केली या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी वेळोवेळी मराठी माणसांच्या प्रश्नांवर आवाज उठवला शिवसेनेच्या या लढ्यामुळेच आज मराठी माणूस मुंबईत स्वाभिमानाने जगत असून याचे सर्व श्रेय बाळासाहेबांना जाते असेही ते  म्हणाले. शिवाजी नगर येथील आ.डॉ.राहुल पाटील यांच्या संपर्क कार्यालयात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यांच्या जयंतीनिमित्त सोमवार, दि.२३ जानेवारी रोजी अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ.राहुल पाटील बोलत होते. 

यावेळी सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, महिला विधा/नसभा संघटक सौ.अंबिका डहाळे, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, अरविंद देशमुख, संग्राम जामकर, रविंद्र पतंगे, ज्ञानेश्वर पवार, सुशील कांबळे, प्रशास ठाकूर, सुभाष जोंधळे, करामत खान, संदीप झाडे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, विशु डहाळे, अमोल गायकवाड, राहुल खटींग, मारोती तिथे, किशोर रणेर, दिलीप गिराम, उध्दव मोहिते, बाळासाहेब गोडबोले, गणेश मुळे, शुभम हाके, राजु ताठे, नरेश देशमुख, माऊली साळवे, शेख अब्दुल्ला राज, रामा कदम, महेश पारवेकर, सरपंच दामोधर सानप, सचिन गारूडी, बाबु फुलपगार, मकरंद कुलकर्णी, बबलु घागरमाळे, राहुल कांबळे, गौतम भराडे, अशोक गव्हाणे, बबन कल्याणकर, महिला आघाडीच्या नंदिनी पानपट्टे, कमल कासले, कविता नांदुरे, रेखा अग्रवाल, मंदा दहीवाळ, लिना फुटाणे, वैशाली खांदे, सौ.धोत्रे, रमेश शिर्के, शिव चव्हाण, अंकुश मंडळकर, विशाल कळसाईतकर, गोविंद इक्कर, माऊली साळवे, महेंद्र फुटाणे आदी सह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, दलित आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

यावेळी बोलताना आमदार डॉ.पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनाच जीवन मानणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे एक महान राष्ट्रभक्त आणि हिंदुत्वाचे तेजस्वी रुप होते प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडून त्यांनी पुरोगामित्व आणि सामान्य माणसाच्या व्यथांना आवाज देण्याची शिकवण घेतली केवळ महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे तर देशाच्या राजकारणात आणि समाजकारणात चैतन्य फुलवणारे बाळासाहेब हे लेखक, पत्रकार, व्यंगचित्रकार, परखड वक्ते आणि मनस्वी कलाकार असे बहुआयामी व्यक्तीमत्व होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य आणि नेतृत्व शब्दांत सांगणे अशक्य आहे. त्यांचे विचार पुढील पिढ्यांना देखील प्रेरणा देत राहतील, असे सांगत आमदार डॉ.पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी डॉ.नावंदर यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या