💥पुर्णा तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी...!


💥यावेळी शालेय व्यवस्थापण समितीचे समितीचे अध्यक्ष गंगाधर इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती💥

पुर्णा (दि.०३ जानेवारी) - तालुक्यातील देगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज मंगळवार दि.०३ जानेवारी २०२३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.यावेळी शालेय व्यवस्थापण समितीचे समितीचे अध्यक्ष गंगाधर इंगोले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष इंगोले यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद कानडखेडकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जिवण कार्यावर प्रकाशज्योत टाकला यावेळी शाळेतील गायकवाड़ सर धाडे सर यांच्यासह सर्व कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या