💥हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी येथील अखंड हरिनाम सप्ताह...!


💥हरिनाम सप्ताहात भाविकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती💥 


शिवशंकर निरगुडे : हिंगोली

हिंगोली (दि.०८ जानेवारी) - हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील बोरखेडी बाळू मामाची येथे दरवर्षीप्रमाने याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमदभागवत कथा सोहळा आयोजित करण्यात आला असून या हरिनाम सप्ताहात असंख्य भाविक भक्तांनी लाभ घेतला सप्ताहचे दैनंदिन कार्यक्रम पहाटे सकाळी चार ते पाच काकडा भजन पहाटे सहा ते सात श्रीची महापूजा सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायन सकाळी अकरा ते दुपारी चार पर्यंत भागवत कथा सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्रि आठ ते दहा हरी कीर्तन झाले.  दि 07/01/2023 रोजी शनिवारी दुपारी बाळू मामाच्या पालखीची गावात मिरवणूक काढण्यात आली होती आज ८ जानेवारी रोजी ह.भ.प. उमेश  महाराज दशरथे आळंदी  यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत कीर्तन झाले व नंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन"करण्यात आले आहे. दि 7 जानेवारी रोजी मंगळवारी दुपारी 12 वाजता संत बाळू मामा याच्या पालखी सोहळाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी पूर्ण गावातून पालखीचे मिरवणूक काढण्यात आली.


आज रविवार दि.08 जानेवारीला काल्याच्या किर्तनाला हजारोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. बोरखेड येथील बाळू मामाच्या आज शेवटचे कल्याचे कीर्तन असल्याने हिवरखेडा खडकी घोरदरी धोतरा कापडशिंगिसह आदी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत या ठिकाणी भाविकांनी खूप मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मिठाई खेळणीचे दुकाने देखील दाखल झाले होते. काल्याच्या  7 कीर्तनाचा हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद या सर्वच १ कार्यक्रमाचे नियोजन बोरखेड येथील ग्रामस्थांच्या वतीने व येथे आलेल्या प्रत्येक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले या ठिकाणी सुमारे दहा हजार भाविकांची गर्दी मंादियाळी पहायला मिळाली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या