💥मा.मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी आ.विक्रम काळे यांना प्रथम पसंतीचे मत देऊन विजयी करा...!


💥असे आवाहन अध्यक्ष कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था व नाथ शिक्षण संस्थेचे सहसचिव प्रदीप खाडे यांनी केले💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :-  औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ निवडणूकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री आ.धनंजय मुंडे यांचे जिव्हाळ्याचे सहकारी आ.विक्रम काळे यांना शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी व आ.धनंजय मुंडे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रथम पसंतिचे मत देऊन पुन्हा एकदा प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन अध्यक्ष कै.रामभाऊ (आणा) खाडे सेवाभावी संस्था व नाथ शिक्षण संस्थेचे सह सचिव प्रदीप खाडे यांनी केले आहे. 

          महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणूक - २०२३ साठी महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेल्या अधिकृत उमेदवार तसेच राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आ.धनंजय मुंडे  यांचे जिव्हाळ्याचे सहकारी आ.विक्रम काळे यांना सर्वाधिक मतदधिकय परळी मतदारसंघतील शिक्षक मतदार बांधवयांनी देऊन विजयी करावे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम प्रयत्नशील असलेले अभ्यासु व्यक्तिमत्व आहेत.  शिक्षण क्षेत्राचा अभ्यास असलेले व्यक्तिमत्व आहेत. मागील सलग तीन वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत असताना आ. विक्रम काळे यांनी या मतदार संघातील शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने सरकार दरबारी आवाज उठवलेला असून, न्याय देण्याचे काम केलेले आहे.  शिक्षकांना त्यांचे प्रश्न सोडवनारा हक्काचा माणूस बप्पाच्या रूपाने सरकार मध्ये लाभणार आहे.      

        राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री आ.धनंजय मुंडे  यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा शिक्षक विधान परिषद निवडणूकीत शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे आ. विक्रम काळे हे महाविकास आघडीचे उमेदवार असून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशिल असतात. या निवडणूकीत परळी मतदार संघात प्रचाराचे रान उठविले असून विजय आपला निश्चितच आहे, आता केवळ पसंती क्रमांक 1 अशी नोंद करून या विजयावर शिक्कामोर्तब करायचे आहे असेही श्री. प्रदीप खाडे म्हणाले. या निवडणूकीत आ.विक्रम काळे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असून त्यांच्या विजयात परळीसह आपल्या बीड जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक असावा या दृष्टीकोनातून त्यामुळे सुज्ञ शिक्षक मतदार बंधु-भगिनींनी उच्चशिक्षित व अतिशय अभ्यासु  असलेल्या आ.विक्रम काळे यांना पसंती क्रमांक एक देऊन प्रचंड मताने निवडून देऊन सभागृहात पाठवावे  असेही आवाहन प्रदीप खाडे यांनी केले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या