💥भारताचे जगप्रसिध्द धावपटू ऑलम्पिकवीर सरदार मिल्खासिंघ यांचा डुंझो ॲप्सने केला अपमान....!


💥पुण्यात सिख समाजात संतापाची लाट : सिख बांधवांनी निगडी पोलिस स्थानकात 'डुंझो ॲप्स' कंपनी विरोधात दिली लेखी तक्रार💥


भारताचे जगप्रसिध्द धावपटू ऑलम्पिकवीर सरदार मिल्खासिंघ यांचा डुंझो ॲप्स कंपनीने अपमान केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून डुंझो ॲप्स डिलिव्हरी करणाऱ्या कागदी पिशव्यांवर संबंधित कंपनीने पद्मश्री ऑलम्पिकवीर स्वर्गीय सरदार मिल्खासिंघ यांच्या नावाचा तसेच फोटोचा देखील अत्यंत वाईट पध्दतीने करून त्यांच्यासह संपूर्ण सिख समाजाचा अपमान केला असल्यामुळे सिख समाज बांधवांमध्ये तिव्र असंतोष पसरला आहे.


या घटने संदर्भात सिखा समाज बांधवांनी आज शुक्रवार दि.२० जानेवारी २०२२ रोजी  'डुंझो ॲप्स' कंपनी विरोधात तिव्र शब्दात निषेध नोंदवत निगडी पिंपरी चिंचवड पोलिस स्थानकात लेखी स्वरुपात तक्रार दाखल केली असून या तक्रारीत असे नमूद केले आहे की  'डुंझो ॲप्स' कंपनी विरोधात तात्काळ कारवाई करुन या कपनीच्या कागदी पिशव्या त्यांच्या सर्व आऊटलेट मधून बंद करण्यात याव्यात अन्यथा सिख समुदायाच्या रोषास त्यांना सामोरे जावे लागेल असा इशारा देखील देण्यात आला असून या निवेदनावर अर्जदार सरदार कमलजीतसिंघ यांची स्वाक्षरी आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या