💥चिखली येथे आज संध्याकाळी आर्ट ऑफ लिविंग परिवाराच्या वतीने भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन.....!


💥आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भजनकार संगीतकारांची उपस्थिती💥

चिखली (दि.२९ जानेवारी) -  स्थानिक आग्रसेंन हॉटेल रिसॉर्ट येथे आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने दि.२९ जानेवारी रोजी सुमेरू संध्या (भजन संध्या) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

  अध्यात्मिक गुरु व विश्वशांती दूत श्री श्री रविशंकरजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात भक्ती की लहर प्रोजेक्ट अंतर्गत वेगवेगळे सेवा कार्य सुरू आहेत त्यात  रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी , स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व सुमेरू संध्या (भजन संध्या) अश्या वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने करण्यात येत असून भक्ती कि लहर अंतर्गत चिखली नगरीत सुद्धा सुमेरू संध्या (भजन संध्या) कार्यक्रमाचे आयोजन चिखली येथील हॉटेल आग्रसेंन रिसॉर्ट जालना रोड चिखली येथे दि.२९ जानेवारी रविवार रोजी संध्याकाळी ठीक ६ ते ८ यावेळी करण्यात आलेले आहे यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त भजनकार व संगीतकार द्वारा गान ज्ञान व ध्यान प्रस्तुत करण्यात येणार असून जास्तीतजास्त भाविकांनी सदर कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आव्हान आर्ट ऑफ लिविंग चिखली परिवाराचे प्रशिक्षक सुनील भोजवाणी,उदय शेटे,कविता भोजवाणी,प्रवीण पडघान,व ऍड. गीता भोजवाणी यांच्या वतीने करण्यात आल्याचे आर्ट ऑफ लिविंग परिवाराचे सदस्य प्रशांत ढोरे पाटील यांनी  माहिती कळविले आहे....

 ✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या