💥जिंतूर-सेलु विधानसभा मतदार संघातील ४२ सरपंचासह सदस्य ही बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल ?


💥कळमनुरीचे आमदार संतोष बांगर परभणीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश💥

जिंतूर प्रतिनिधी / बि.डी.रामपूरकर

शिंदे आणि ठाकरे गटात शिवसेनेच्या वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाड्यात महाविकास आघाडीला मोठा राजकीय धक्का दिला आहे. यामध्ये जिंतूर सेलू मतदारसंघातील ४२ सरपंचासह कार्यकर्त्यांचा समावेश असल्याचा दावा सौ.अक्षता राजेश चक्कर पाटील यांनी केला आहे.


कळमनुरीचे आमदार संतोष बांगर तसेच परभणीचे शिवसेना जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिंतूर येथील शिंदे गटाच्या नेत्या अक्षता राजेश चक्कर पाटील यांच्या पुढाकारातून जिंतूर सेलू मतदारसंघातील ४२ गावच्या सरपंचासह कार्यकर्त्यांचा मुंबई येथे जाऊन पक्ष प्रवेश केला असल्याची माहिती सौ. अक्षता राजेश चक्कर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

यामुळे महाविकास आघाडीसह भारतीय जनता पार्टीला जिंतूर- सेलू मतदारसंघांमध्ये खिंडार पडल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत परभणीतील ८४. सरपंचांनी शिंदे गटात नुकताच प्रवेश केला त्यामध्ये जिंतूर सेलू मतदारसंघातील ४२ सरपंचाचा समावेश असल्याचा दावा सौ. अक्षता चक्कर यांनी केला आहे. राज्यभरातील शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता मोठ्या संख्येने सरपंचांनीही शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्याचा महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ४२ गावच्या सरपंचाने शिंदे गटात प्रवेश केल्याने अक्षता चक्कर पाटील यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या