💥१०० वेळा रक्तदान करणाऱ्या शतकवीर रक्तदाते शिवलिंग बोधने यांचा परभणी जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने सत्कार......!


💥या वेळी मराठी पत्रकार संघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार हट्टेकर यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.१० जानेवारी) - प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी नुकतेच आपले १०० वे रक्तदान करून रक्तदानाचे आपले शतक पूर्ण केले. सन १९९३ मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी रक्तदानाला सुरुवात केली होती व ते दर तीन महिन्याला शासकीय रक्त पेढीत जाउन रक्तदान करतात शिवाय गरवंतांना व थेलिसीमिया रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे या साठी त्यांनी विविध समाजिक व राजकीय संघटना व प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून २५ ते ३० वेळा रक्तदान शिबीर आयोजित केले आहेत.

१०० वे रक्तदान करून आपले रक्तदानाचे शतक पूर्ण केल्या बद्दल शिवलिंग बोधने यांचा आज परभणी जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी मराठी पत्रकार संघाचे परभणी जिल्हा अध्यक्ष राजकुमार हट्टेकर, कार्याध्यक्ष प्रभू दिपके, प्रा.सुरेश नाईकवाडे, लक्ष्मण मानोलीकर, धनाजी चव्हाण, सत्वजित सत्वसे, श्रीकांत बनसोडे, बाळासाहेब काळे, नागेश नागठाणे इत्यादी पत्रकार बांधवांसह प्रहार जनशक्ती पक्षाचे महिला आघाडी जिल्हा प्रमुख माधवीताई घोडके पाटील, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, मिडीया प्रभारी नकुल होगे, शहर चिटनीस वैभव संघई, महिला आघाडी शहर चिटनीस ऍड सुवर्णाताई देशमुख, उपशहर प्रमुख सुषमाताई देशपांडे, शेख बशीर यांच्यासह पदाधिकारी मोठया प्रमाणावर उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या