💥परभणी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत : पुर्णेच्या हक्काचे इलेक्ट्रिक लोको ट्रिपशेड नांदेड जिल्ह्यात ?


💥पुर्णेच्या मदतीला धावल्या एकमेव रणरागीनी आ.मेघनाताई बोर्डीकर : इलेक्ट्रिक लोको ट्रिपशेड पुर्णेला करण्याची मागणी💥


💥पूर्णेकराच्या अपेक्षावर दक्षिण मध्य रेल्वेच्या भाषा/प्रांतवादास प्राधान्य देणाऱ्या अधिकाऱ्यांनी पुन्हा फेरले पाणी💥

💥पुर्णा तालुक्याचा भाषा/प्रांतवादाच्या नावावर दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन कुठवर घेणार बळी ? पुर्णेकरांचा संतप्त सवाल💥


पूर्णा (दि.३१ जानेवारी) - दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी भाषावाद/प्रांतवादाच्या नावावर पुर्णा तालुक्यावर सातत्याने अक्षरशः सुड उगवून पुर्णेतील अनेक रेल्वेची महत्वाची कार्यालय नांदेडला स्थलांतरीत करीत असतांना या तालुक्यातील जनसामान्यांच्या मतांवर निवडून आलेले लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन या अन्यायाचे सचित्र चित्रण पाहत मला काय त्याचे असे म्हणून बघून न बघितल्या सारखे करीत या अन्यायाला एकप्रकारे पडद्याआड लपून पाठींबाच देत होते की काय ? असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण होत आहे.


मराठवाड्यातील सर्वात मोठे जंक्शन असलेल्या पुर्णा रेल्वे स्थानकावरील अनेक महत्वाची कार्यालय दक्षिण मध्य रेल्वेच्या मराठीद्वेष्ट्या अधिकाऱ्यांनी पुर्णेत सर्व सुख सुविधांसह शेकडो एक्कर जमीन उपलब्ध असतांना देखील प्रथमतः पुर्णेकरांच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय कार्यालय (डिआरएम आँफीस) नांदेडला व यानंतर रेल्वे कोच निर्मिती कारखाना लातूरला पळवण्याचे महापाप केले यानंतर देखील मनाचे समाधान झाले नसल्यामुळे पुन्हा सुडभावनेने भाषावाद/प्रांतवाच्या नावावर रेल्वेची अनेक महत्वाची कार्यालय नांदेड येथे स्थलांतरीत केली हा सर्व गंभीर प्रकार घडत असतांना मात्र परभणी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी अक्षरशः मुग गिळून गप्प का बसले असावे ? असा पूरश्न उपस्थित होत असतानांच पुन्हा दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने  अकोला-पूर्णा लोहमार्गावर इलेक्ट्रीक लाईनचे काम प्रगतीपथावर आले असतांना या इलेक्ट्रिक लाईचे मिनी ट्रिप शेड पूर्णेत शेकडो एक्कर हक्किची जमिन उपलब्ध असतांना देखील सदरील इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड नांदेड येथे बनवण्यासाठी दि.१८ जानेवारी २०२३ रोजी लेखी स्वरुपात फर्माण जारी केल्यामुळे पुर्णेकरांमध्ये तिव्र संताप व्यक्त होत असतांना मात्र परभणी जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेत असतांना पुर्णेकरांच्या मदतील जिल्ह्यातील एकमेव रणरागीनी जिंतूर विधानसभा मतदार संघाच्या लोकप्रिय भाजपा आमदार मेघनाताई बोर्डीकर साखोरे या धावून आल्या असून त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दाणवे यांना आज ३१ जानेवारी २०२३ रोजी लेखी स्वरुपात पत्र देऊन इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड नांदेड ऐवजी पुर्णेत करण्याची मागणी केली असून त्यांनी रेल्वे राज्यमंत्री दाणवे यांना लिहिलेल्या पत्रात असे नमुद केले आहे की पुर्णा जंक्शन हे स्वातंत्र्यापुर्व काळापासून म्हणजे सुमारे १२५ वर्षापासून रेल्वेचे भौगोलिक व प्रशासकीय दृष्ट्या मध्यवर्ती केंद्र असून येथे रेल्वेची शेकडो एक्कर जमीन उपलब्ध असतांना देखील दक्षिण मध्य रेल्वे प्रशासन जाणीवपूर्वक येथील हक्काचे इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड नांदेडला बनवण्याच्या दृष्टीने पावल उचलत आहे यापुर्वी देखील दक्षिण मध्य रेल्वे विभागीय कार्यालयासह रेल्वेची अनेक महत्वाची उपविभागीय रेल्वे कार्यालय नांदेडला स्थलांतरीत करण्यात आली मिटरगेज रेल्वे विभाग रचनेच्या वेळी पुर्णा हे विभागीय कार्यालय होणे अपेक्षित असतांना केवळ भाषावाद व प्रांतवादासह मराठी द्वेषाच्या भुमिकेतून सन १९७७ यावर्षी हैद्राबाद येथे एकाच इमारतीत दोन विभागीय कार्यालयांची निर्मिती जाणीवपूर्वक करण्यात आली त्यानंतर नांदेड विभागाची स्वतंत्र निर्मिती करतांना देखील पुर्णेला डावलण्यात आले एवढेच नव्हे तर पुर्णा येथील अनेक कार्यालय जाणीवपूर्वक स्थलांतर करून अन्यायाची परंपरा कायम ठेवण्यात आली पुर्णा येथे असलेले डिझल लोको शेड कायमस्वरुपी बंद करून भौगोलिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या जागेवर इतरत्र हलविण्यात आले.अनेक वर्षापासून होम शेडची मागणी बदलत्या परिस्थिती नुसार विद्युतीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाल्याने पुर्णेला इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड मिळणार अशी अपेक्षा असतांना अलीकडील काळात ते सुध्दा नांदेडला स्थापण करण्याच्या हालचालींना वेग आला असल्यामुळे रेल्वे राज्यमंत्री  मा.ना.रावसाहेब दाणवे साहेब यांनी पुर्णेकरांच्या मागणीची दखल घेऊन इलेक्ट्रिक लोको ट्रिप शेड पुर्णेला स्थापण करण्याच्या दृष्टीने योग्य ती कारवाई करावी अशी देखील मागणी आ.मेघनाताई साखोरे बोर्डीकर यांनी केली असून पुर्णेकरांवर अन्याय होत असतांना जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधी कुंभकर्णी झोपेचे सोंग घेऊन गप्प असतांना जिल्ह्यातील एकमेव रणरागीनी आ.मेघनाताई बोर्डीकर पुर्णेकरांच्या मदतीला धावून आल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.......
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या